Marathi News> भारत
Advertisement

काँग्रेसच भ्रष्टाचाराची जननी - भाजप

राफेल विमानांच्या खरेदी प्रकरणावरून काँग्रेसची पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका आणि भाजपचे प्रत्युत्तर

काँग्रेसच भ्रष्टाचाराची जननी - भाजप

नवी दिल्ली : राफेल विमानांच्या खरेदी प्रकरणावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली. मात्र यावेळचा त्यांचा पंतप्रधानांवरील हल्ला अधिक तिखट आणि जहाल असल्याचे भाजपकडून प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. काँग्रेसच भ्रष्टाचाराची जननी आहे, आरोप भाजपकडून करण्यात आलाय.

fallbacks

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहीनं राफेलचे कंत्राट उद्योगपती अनिल अंबानींच्या कंपनीला देण्यात आल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय. पंतप्रधान मोदींनी अंबानींना ३० हजार कोटींचं कंत्राट दिल्याचं मान्य करून देशाच्या जनतेला सत्य़ सांगावं, अशी मागणी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केली. 

या सर्व प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीच्या माध्यामातून चौकशी करण्यात यावी अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली. तर राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे असून गांधी घराणं आणि काँग्रेसच भ्रष्टाचाराची जननी असल्याचा पलटवार भाजपचे केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केलाय. 

Read More