Marathi News> भारत
Advertisement

शिक्षणासाठी रस्त्यावर पाणीपुरी विकणाऱ्या मुलीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, Video Viral

शिक्षण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पण काहीजण असे असता की त्यांना पैशाअभावी शिक्षण घेता येत नाही

शिक्षणासाठी रस्त्यावर पाणीपुरी विकणाऱ्या मुलीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, Video Viral

मुंबई: शिक्षण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पण काहीजण असे असता की त्यांना पैशाअभावी शिक्षण घेता येत नाही. शिक्षण म्हटलं की परिश्रम आणि जिद्द आलीच. असाच एक व्हिडीओ (video viral) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी रस्त्याच्याकडेला पाणीपुरी (Panipuri) विकत असल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर (social media) व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी कशाप्रकारे पाणीपूरी विकत असल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत तुम्ही फक्त मुलेच पाणीपूरी विकत असल्याचं ऐकलं असेल. पण शिक्षण पुर्ण करण्यासाठी आता एका मुलीने पाणीपुरी विकायला सुरुवात केली आहे. 

therealharryuppal नावाच्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्स व्हायरल होताना दिसत आहेत. तर एका युजर्सने कमेंट करताना लिहिले, शिक्षण पु्र्ण करण्यासाठी ही मुलगी खरोखर खूप मेहनत घेत आहे.  

Read More