Marathi News> भारत
Advertisement

पीएम मोदींच्या 'मै भी चौकीदार' कॅम्पेनची 'या' कॉमेडीयनने पुन्हा उडवली खिल्ली

 पंतप्रधानांच्या 'मै भी चौकीदार' कॅम्पेनवर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

पीएम मोदींच्या 'मै भी चौकीदार' कॅम्पेनची 'या' कॉमेडीयनने पुन्हा उडवली खिल्ली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'मै भी चौकीदार' कॅम्पेन सध्या देशभरात चर्चेत आहे. मोदींनी सोशल मीडिया अकाऊंटवरील आपल्या नावासमोर चौकीदार शब्द लावल्यानंतर भाजपातील नेते आणि कार्यकर्त्यांनीही त्यांना फॉलो केले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'चौकीदार चोर है' या कॅम्पेनला उत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्तेही पुढे आले. पंतप्रधानांच्या 'मै भी चौकीदार' कॅम्पेनवर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या या कॅम्पेनवर कॉमेडीयन कुणाल कामरा याने निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना 'मै भी चौकीदार' कॅम्पेनला कुणालने ट्वीट करत लक्ष्य केले आहे. 
 
 'मै भी चौकीदार' कॅम्पेनची खिल्ली उडवणारे ट्वीट कुणालने केले आहे. 'काही वेळासाठी मोदीजी बुक माय शोवर आपल्या निवडणुकीचे तिकीट विकायला सुरूवात करतात' अशा आशयाचे ट्वीट त्याने केले. त्याचे हे ट्विट सोशल मीडियात वायरल होत आहे. 

'मै भी चौकीदार' कॅम्पेन आणि पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटर वरून निशाणा साधणारा कुणार कामरा हा मुंबईतील कॉमेडीयन आहे. पॉलिटीकल-कॉमेडी करण्यात त्याच्या हातखंडा आहे. त्याचा शट अप यार कुणाल हा शो खूप प्रसिद्ध होतोय. आठ वर्षे जाहीरात क्षेत्रात काम केल्यानंतर त्याने 2013 मध्ये स्टॅंडअप कॉमेडीची सुरूवात केली. सोशल मीडिया वर वेगवेगळी राजकीय, सामाजिक विधाने करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे.  

Read More