Marathi News> भारत
Advertisement

शहीद कर्नल संतोष बाबूंच्या आईला 'या' गोष्टीचं जास्त दु:खं

शहीद कर्नल संतोष बाबूंच्या आईला 'या' गोष्टीचं जास्त दु:खं

शहीद कर्नल संतोष बाबूंच्या आईला 'या' गोष्टीचं जास्त दु:खं

नवी दिल्ली : चीनी सैनिकांसोबत झालेल्या झडपेत कर्नल संतोष बाबू शहीद झाले. हे वृत्त कळताच नालगोंडा जिल्हा (तेलंगणा) च्या सुर्यपेट शहरामध्ये दु:खाचे वातावरण पसरले. यावर शहीद कर्नल संतोष यांच्या आईने प्रतिक्रिया दिलीय. माझा मुलगा शहीद झाला याचा गर्व असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या आईने दिलीय. सोबतच आपला एकुलता एक मुलगा आता परत येणार नाही याचं दु:ख देखील तिने व्यक्त केलंय. 

fallbacks

गालवान घाटी (पूर्व लडाख) मध्ये एलएसीवर चीनी सैनिकांसोबत झालेल्या झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले. कर्नल संतोष हे १६ बिहार रेजिमेंटचे कमांडींग ऑफिसर होते. ते दीड वर्षांपासून सीमेवर तैनात होते. त्यांच्यामागे  पत्नी, ९ वर्षांची मुलगी अभिनव आणि ४ वर्षांचा मुलगा अनिरुद्ध असा परिवार आहे. 

चीनीसैनिकांसोबत झालेल्या झडपेत भारतीय जवान शहीद झाल्याच्या घटनेने देशाला हादरवून सोडलं. वरिष्ठ कमांडर ऑफिसर्सनी ६ जूनच्या बैठकीत अशा प्रकारच्या डी-एस्केलेशनच्या प्रक्रियेला सहमती दिली होती असे परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. यानंतर ग्राऊंड कमांडरांद्वारे प्रकरण मिटवण्यासाठी बैठका झाल्या. वाद लवकर मिटेल अशी आशा होती पण चीनने तसे होऊ दिले नाही. 

१५ जूनला संध्याकाळपासून रात्रीपर्यंत चीनसोबत सुरु असलेल्या चर्चेचे स्वरुप हिंसक झडपेने घेतले. यामुळे दोन्ही देशांचे नुकसान झाले. याआधी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत सेना प्रमुख आणि डिफेंस स्टाफ बिपिन रावत देखील होते असेही वृत्त आहे. 

भारतासमोर ५ पर्याय

चीन (China) भारतात घुसघोरी करण्याचा प्रयत्नात होता. लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा डावा होता. एलएसी बदलण्याचा प्रयत्न करण्याचा इरादा होता. आणि भारत (India) काहीही करू शकणार नाही, अशी चीनची धारणा होती. मात्र, चीन हे विसरला आहे की तो १९६२ चा भारत नाही. हा २०२० चा न्यू इंडिया आहे, ज्याने प्रत्येक युद्धाला जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे. न्यू इंडियाचा संकल्प असा आहे की जर आपण छेडले तर आम्ही सोडणार नाही. डोकलाम ते गलवान खोऱ्यापर्यंत चीनला याचा पुरावा मिळाला आहे.

चीनविरुद्ध राजनैतिक आणि सैन्यचा पर्याय 
पहिला पर्याय - चीनविरूद्ध कठोर कारवाईची रणनीती बनविणे
दुसरा पर्याय - चीन एलएसीला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देणे
तिसरा पर्याय - चीन विरुद्ध आंतरराष्ट्रीय दबाबचा भाग म्हणून जे देश चीनच्या विरोधात आहेत  त्यांना भारताबरोबर एकत्र आणणे
चौथा पर्याय - भारतीय नौदलाने चीनविरोधात पावले उचललने. समुद्रावर घेराव घालून दबाव आणणे आणि चीनशी तडजोड करण्यास भाग पाडले पाडणे
पाचवा पर्याय - भारताने चीनविरुद्ध सूड उगवायला हवे, त्यांच्या कारवाईला जोरदार प्रत्युत्तर देणे.

Read More