Marathi News> भारत
Advertisement

ऐतिहासिक घटना : निवडणुका नसताना 'या' राज्यात आचारसंहिता

या निर्णयामुळं तेलंगणातील सरकारला कुठल्याही नव्या घोषणा करता येणार नाहीत.

ऐतिहासिक घटना : निवडणुका नसताना 'या' राज्यात आचारसंहिता

तेलंगणा : निवडणुका नसताना राज्यात आचारसंहिता लागू होण्याची घटना देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलीय. तेलंगणामध्ये गुरुवारपासून आचारसंहिता लागू करत असल्याची घोषणा निवडणूक आयोगानं केलीय. ज्या राज्यांमधील विधानसभा मुदतीपूर्वी बरखास्त झालेल्या आहेत, त्या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करत असल्याचं आयोगानं म्हटलंय.

असे होतील बदल

या निर्णयामुळं तेलंगणातील सरकारला कुठल्याही नव्या घोषणा करता येणार नाहीत. जून २०१९ पर्यंत कार्यकाळ असणारी तेलंगणा विधानसभा नुकतीच बरखास्त करण्यात आली. सध्या काळजीवाहू सरकार राज्याचा कारभार पाहतंय. 

आता विधानसभा निवडणुका होऊन नवं सरकार सत्तेवर येईपर्यंत आचारसंहिता कायम असणार आहे. त्यामुळं तेलंगणाबाबत राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला कुठलीही घोषणा करता येणार नाही. 

Read More