Marathi News> भारत
Advertisement

पश्चिम बंगालमध्ये शैक्षणिक संस्था 20 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश

राज्यात ३ दिवस संपूर्ण लॉकडाऊन घेतला जाणार.

पश्चिम बंगालमध्ये शैक्षणिक संस्था 20 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश

कोलकाता : देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असताना पश्चिम बंगाल सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शैक्षणिक संस्था 20 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये आणि अन्य शैक्षणिक संस्था बंद आहेत. कोरोनाचा कहर अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारने 20 सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालये व अन्य शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

याशिवाय पश्चिम बंगाल सरकारनेही राज्यात संपूर्ण लॉकडाऊनच्या ताज्या तारखा जाहीर केल्या आहेत. पश्चिम बंगाल सरकारने सध्या सप्टेंबर महिन्यात तीन तारखांची घोषणा केली आहे. या दिवशी राज्यात संपूर्ण लॉकडाऊन असेल. राज्यात 7, 11 आणि 12 सप्टेंबर रोजी संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

Read More