Marathi News> भारत
Advertisement

लुधियाना महापालिकेत काँग्रेसची बाजी, भाजप-अकाली दलाचा धुव्वा

देशातून काँग्रेस हद्दपार करण्याचा विडा उचलेल्या भाजपला काँग्रेसने पुन्हा एकदा दणका दिलाय. गुजरात, राज्यस्थान, मध्यप्रदेश या राज्यांत काँग्रेसने मुसंडी मारली असताना आता पंजाबमधील लुधियाना महानगरपालिकेत काँग्रेसने बाजी मारत भाजप-अकाली दलाचा धुव्वा उडवलाय.

लुधियाना महापालिकेत काँग्रेसची बाजी, भाजप-अकाली दलाचा धुव्वा

चंदिगड : देशातून काँग्रेस हद्दपार करण्याचा विडा उचलेल्या भाजपला काँग्रेसने पुन्हा एकदा दणका दिलाय. गुजरात, राज्यस्थान, मध्यप्रदेश या राज्यांत काँग्रेसने मुसंडी मारली असताना आता पंजाबमधील लुधियाना महानगरपालिकेत काँग्रेसने बाजी मारत भाजप-अकाली दलाचा धुव्वा उडवलाय.

काँग्रेसची एकहाती सत्ता

पंजाबमधील लुधियाना महानगरपालिका निवडणुकीचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. या निवडणुकीत काँगेसने भाजप, शिरोमणी अकाली दल यांना दे धक्का दिलाय. तब्बल ६२ प्रभागांमध्ये विजय मिळविला आहे. भाजपला याठिकाणी केवळ १० जागा तर अकाली दलाला ११ जागांवर विजय मिळाला आहे.

या तीन प्रमुख पक्षांशिवाय लोक इन्साफ पार्टी सात, आम आदमीला एका जागेवर विजय मिळाला आहे. येथे एक अपक्ष उमेदवारही निवडून आलाय. लुधियाना नगरपालिकेच्या ९५ जागांसाठी २४ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत ५९.१४ टक्के म्हणजे १० लाख ८५ हजार मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता.

भाजपला अतिआत्मविश्वास नडला

या निवडणुकीत एकूण ४९४ उमेदवार उभे होते. यापूर्वी येथील निवडणूक ही काँगेस आणि शिरोमणी अकाली दल-भाजप युती यांच्यामध्ये होत होती. यावेळी ही युती नव्हती.  मात्र, भाजपला अतिआत्मविश्वास नडला.   

भाजपला नागरिकांनी नाकारले

 लुधियाना ही पंजाबमधील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. या निवडणुकीत पाणीपुरवठा, साफसफाई, स्वच्छता, प्रदूषण, खराब रस्ते हे महत्त्वाचे प्रचाराचे मुद्दे होते. भाजपला येथील नागरिकांनी सपशेल नाकारले.

Read More