Marathi News> भारत
Advertisement

अरुणाचलमध्ये चीनने बांधले कॅम्प आणि पोस्ट

डोकलाम मुद्द्यावरून वाद सुरू असताना चीनने आता अरुणाचलमध्ये नव्या कुरापती करायला सुरूवात केली आहे.

अरुणाचलमध्ये चीनने बांधले कॅम्प आणि पोस्ट

नवी दिल्ली : डोकलाम मुद्द्यावरून वाद सुरू असताना चीनने आता अरुणाचलमध्ये नव्या कुरापती करायला सुरूवात केली आहे. अरूणाचलच्या एका भागात बांधणीचे काम सुरू केले आहे. अरुणाचल प्रदेशच्या किबिथुच्या दूसऱ्या बाजूस आणि पायाभूत सुविधा, शिबिर आणि चीनी आर्मी सेना'(पीएलए)  चे कॅम्प आणि घर बनविण्यात येत आहेत. एएनआयने वृत्तसंस्थेने यातील काही फोटो प्रकाशित केले आहेत. एवढच नव्हे तर चीनने कशाप्रकारे दूरसंचार टॉवर उभे केले आहेत हेदेखील पाहायला मिळत आहे. नियंत्रण रेषेवर नजर राहिल अशा पोस्टही बनविण्यात आल्या आहेत. 

डोकलाम हा चीनचा हिस्सा ?

डोकलामची जागा चीनची असल्याने यासंदर्भात कोणता प्रश्नच उद्भवत नसल्याचे चीनतर्फे २६ मार्च सांगण्यात आले होते.

पण कोणत्याही प्रकारचे बांधकाम करणाऱ्यावर भारताचे राजदूत गौतम बंबावले यांनी चेतावनी दिली होती. सीमा मुद्दा प्रकरणी आम्हाला शांती, स्थिरता कायम ठेवण्यास कटीबद्ध असल्याचे चीनच्या विदेश मंत्रालय प्रवक्त्याने सांगितले. डोकलाम हा चीनचा हिस्सा असून आमच्याकडे ऐतिहासिक करार असल्याचा पुनरुच्चारही करण्यात आला. 

 

Read More