Marathi News> भारत
Advertisement

औषधांच्या ऑनलाईन विक्रीविरोधात केमिस्टचा २८ सप्टेंबरला बंद

औषधांच्या ऑनलाईन विक्रीच्या विरोधात २८ सप्टेंबरला केमिस्टनी बंदची हाक दिली आहे.

औषधांच्या ऑनलाईन विक्रीविरोधात केमिस्टचा २८ सप्टेंबरला बंद

मुंबई : औषधांच्या ऑनलाईन विक्रीच्या विरोधात २८ सप्टेंबरला केमिस्टनी बंदची हाक दिली आहे. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टनं (एआयओसीडी) हा बंद पुकारला आहे. भारतातले सगळे केमिस्ट २८ सप्टेंबरला एक दिवसाचा बंद पुकारणार आहेत. औषधांची ऑनलाईन विक्री केल्यास ग्राहकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा दावा संघटनेनं केला आहे. ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या कंपन्या सर्रासपणे औषध कायद्याच्या तरतुदींचं उल्लंघन करत आहेत आणि अधिकारी त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करत नाहीत, असा आरोप संघटनेनं केला आहे. 

Read More