Marathi News> भारत
Advertisement

Chandrayaan 3: चंद्र नेमका कसा दिसतो? पाहा विक्रम लँडरवरील कॅमेऱ्याने शूट केलेला VIDEO

Chandrayaan-3 च्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाचा एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने ट्विटरला हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या कॅमेऱ्याने हा व्हिडीओ शूट केला आहे त्याचं नाव LPDC म्हणजेच लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा आहे.   

Chandrayaan 3: चंद्र नेमका कसा दिसतो? पाहा विक्रम लँडरवरील कॅमेऱ्याने शूट केलेला VIDEO

Chandrayaan-3 23 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिग करणार आहे. त्याआधी 17 ऑगस्टला चांद्रयानच्या मुख्य यानापासून (प्रोपल्शन मॉडेल) विक्रम लँडर वेगळं झालं आहे. त्यानंतर डीबूस्टिंग प्रक्रियाही यशस्वी झाली आहे. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष लँडिगकडे लागलं असतानाच इस्रोने चंद्राचा व्हिडीओ शेअर केला आहे. विक्रम लँडरवर लावण्यात आलेल्या LPDC म्हणजेच लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेराने हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओत चंद्राचा पृष्ठभाग दिसत आहे. 

LPDC विक्रम लँडरच्या खालच्या बाजूला लावण्यात आला आहे. विक्रम लँडर आपल्या लँडिगसाठी योग्य आणि सपाट पृष्ठभाग शोधू शकेल यासाठी हा कॅमेरा तिथे लावण्यात आला आहे. या कॅमेऱ्याच्या मदतीने विक्रम लँडर खडबडीत जागी लँडिंग करणार नाही याची काळजी घेतली जाईल. म्हणजेच विक्रम लँडर एखादा खड्डा म्हणजेच क्रेटरमध्ये जाणार नाही. 

ISRO ने गाठला आणखी एक मोठा टप्पा; Chandrayan 3 ची Deboosting प्रक्रिया यशस्वी

 

या कॅमेऱ्याला लँडिगच्या आधी पुन्हा एकदा सुरु केलं जाऊ शकतं. कारण जे फोटो समोर आले आहेत, त्यावरुन तरी ट्रायलसाठी हा कॅमेरा सुरु करण्यात आल्याचं दिसत आहे. जेणेकरुन हा कॅमेरा कितपत योग्य काम करत आहे आणि किती स्पष्ट फोटो देऊ शकतो याची चाचपणी करता येईल. चांद्रयान 2 मध्येही या सेन्सॉरचा वापर करण्यात आला होता. त्यानेही चांगलं काम केलं होतं. 

LPDC चे काम विक्रमसाठी योग्य लँडिंग स्पॉट शोधणं आहे. लँडर हजार्ड डिटेक्शन अँड अवॉयडन्स कॅमेरा (LHDAC), लेझर अल्टिमीटर (LASA), लेझर डॉपलर वेलोसिटीमीटर (LDV) आणि लँडर हॉरीजोंटल वेलोसिटी कॅमेरा (LHVC) या पेलोडसह एकत्र काम करतील. जेणेकरून लँडर सुरक्षित पृष्ठभागावर उतरवता येईल.

विक्रम लँडर ज्यावेळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, तेव्हा त्याची गती 2 मीटर प्रतीसेकंदच्या आसपास असणार आहे. पण हॉरिजोंटल म्हणजेच भूपृष्ठाला समांतर गती 0.5 मीटर प्रती सेकंद असेल. विक्रम लँडर 12 डिग्री झुकलेल्या उतारावर उतरू शकतो. ही सर्व उपकरणे विक्रम लँडरला वेग, दिशा आणि सपाट जमीन शोधण्यात मदत करतील. ही सर्व उपकरणे लँडिंग करण्यापूर्वी सुमारे 500 मीटर आधी कार्यान्वित होतील.

चंद्र पृथ्वीची अनेक रहस्ये देखील सोडवू शकतो असे अंदाज वर्तवले जात आहेत. तसंच चंद्रावरील जीवनाच्या शक्यता तपासल्या जात आहेत. चांद्रयान-3 सौरमालेतील उर्वरित अनेक रहस्ये सोडवू शकतो. चंद्राचा दक्षिणेकडील भाग हा जगासाठी अज्ञात आहे. त्यामुळे चांद्रयान-3 तिथे संशोधन करत नवी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. 

Read More