Marathi News> भारत
Advertisement

Video : Chandrayaan 3 मधील प्रज्ञान रोवरनं चंद्र गाठताच तिथं...; इस्रोची नवी माहिती व्यवस्थित वाचा

ISRO नं पाठवलेल्या चांद्रयान 3 नं नुकतीच चंद्रावर यशस्वी लँडिंग केली आणि त्यानंतर आता चांद्रयानातील लँडर आणि रोवरनं त्यांची कामंही सुरु केली आहेत.   

Video : Chandrayaan 3 मधील प्रज्ञान रोवरनं चंद्र गाठताच तिथं...; इस्रोची नवी माहिती व्यवस्थित वाचा

Chandrayaan 3 Rover : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून 23 ऑगस्ट रोजी एक नवा इतिहास रचला गेला. कारण, निर्धारित रुपरेषेनुसार चांद्रयानाचं विक्रम लँडर चंद्रावर यशस्वीरित्या उतरलं आणि त्यामागोमागच 25 ऑगस्ट रोजी चंद्रावर प्रज्ञान रोवरनंही पाऊल ठेवलं. विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोवर बाहेर आला आणि तो क्षण संपूर्ण जगानं पाहिला. कारण, हा तोच क्षण होता जेव्हा चंद्रावर इस्रोचं चिन्हं आणि भारताची राजमुद्राही उमटली. इथं इस्रोच्या या कामगिरीचं कौतुक सुरु असतानाच तिथं इस्रोकडूनच या रोवरविषयी महत्त्वाची माहिती देण्यात आली. 

ठरवल्याप्रमाणं रोवरच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जात आहे. आतापर्यंत रोवरनं यशस्वीरित्या 8 मीटरचं अंतरही ओलांडलं आहे. त्यावर असणारे LIBS आणि APXS सुद्धा सुरु करण्यात आले आहेत. तर, प्रोपल्शन, लँडर आणि रोवरवर असणारे सर्व पेलोड्स व्यवस्थित काम करत असल्याचंही इस्रोनं X च्या माध्यमातून माहिती देत स्पष्ट केलं. 

दरम्यान, चंद्रावर रोवर उतरण्याचा क्षण सर्वांसमोर आणल्यानंतर त्याआधीची प्रक्रियाही एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आणली. जिथं दोन भाग असणारा एक रॅम्प लँडरमधून बाहेर येताना दिसला. लँडरमध्ये असणाऱ्या रोवरला सोलार पॅनलही जोडला असल्याचं इस्रोनं सांगितलं. 

हेसुद्धा वाचा : 'शिवशक्ती' अन् 'तिरंगा...' चंद्रावरील 'त्या' 2 ठिकाणांना मोदींनी दिली नावं! heue Chandrayaan 3 चं अध्यात्मिक कनेक्शन

काय आहेत रोवरची वैशिष्ट्ये? 

प्रज्ञान रोवरवर असणारे सोल पॅनल त्याला सूर्याच्या उष्णतेपासून मिळणाऱ्या उर्जेतून उर्जा देत राहतील. पॅनलखालीच सोलर पॅनल हिंज आहे. ज्यानं या पॅनलला जोडन ठेवलं आहे. या रोवरवर नेव्हिगेशन कॅमेराही आहे, जो या रोवरला पुढील मार्ग दाखवण्यासाठी मदत करेल. चांद्रयानातील या रोवरला सहा चाकांची असेंबली आहे. शिवाय रॉकर बोगीही आहे. त्याच्या खालच्या बाजुला रोवर होल्ड डाऊन आहे. ज्याच्यामुळं जेव्हा रोवर चंद्रावर चालणार नाही, तेव्हा ते एकाच ठिकाणी स्थिर राहील, जिथं या होल्ड डाऊनची मदत होईल. 

 

Read More