Marathi News> भारत
Advertisement

चंद्राबाबू नायडू, नारा लोकेशसह टीडीपीचे अनेक नेते नजरकैदेत

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री  चंद्राबाबू नायडू यांना राहत्या घरी नजरकैदेत करण्यात आले आहे.  

चंद्राबाबू नायडू, नारा लोकेशसह टीडीपीचे अनेक नेते नजरकैदेत

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना राहत्या घरी नजरकैदेत करण्यात आले आहे. चंद्राबाबू हे 'चलो आत्मकूर' आंदोलनात सहभागी झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. देलगू देसम पक्षाच्यावतीने ‘चलो आत्मकुर’ रॅली काढण्यात येत आहे. 

दरम्यान तेलगू देशम पार्टी (टीडीपी) सुप्रीमो आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांना आज बुधवारी नजरकैदेत ठेवण्यात आले. त्याचा मुलगा नारा लोकेश आणि टीडीपी नेत्यांसही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, अशी माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे.

fallbacks

माजी मुख्यमंत्र्यांनी द्राबाबू नायडू यांना राजधानी विजयवाडा जवळील उंडावल्ली येथे त्यांच्या घरी त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप झाल्यानंतर राज्यात तणाव वाढला. अटकेचा निषेध करण्यासाठी चंद्राबाबू नायडू समर्थक रस्त्यावर उतरलेत. काहींनी उपोषणाचा मार्ग पत्करला. त्यामुळे नायडू यांना घरातच स्थाबद्ध करण्यात आले आहे. 

fallbacks

अटकेचा निषेध करण्यासाठी नायडूंच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या टीडीपीचे कित्येक सदस्य पोलिसांशी भिडले. आंद्र प्रदेश पोलिसांनी राज्यभरात निषेध व्यक्त करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

टीडीपीने सत्ताधारी वायएसआर काँग्रेस सरकारच्या कथित "अत्याचार" च्या निषेधार्थ "चलो आत्मकुर" आंदोलन छेडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या घोषणेनंतर पालनाडू भागात हिंसाचार वाढला आहे, असा दावा करत वायएसआरसीपी कार्यकर्त्यांनी तब्बल आठ कार्यकर्त्यांना ठार मारल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, वायएसआर काँग्रेसने याला प्रत्युत्तर देण्यासाठी मोर्चा काढण्याचे ठरविले आहे.

मंगळवारी सकाळपासून गुंटूर जिल्ह्यातील ग्रंथासिरी गावात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले होते. यावेळी दोन्ही गटातील पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना येथील सतनापल्ली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Read More