Marathi News> भारत
Advertisement

PMKSY योजनेत मोठा बदल, पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

या योजनेच्या सुरुवातीला (Pm Kisan Samman Nidhi Scheme) लाभार्थ्यांचा आकडा हा 3 कोटी 16 लाख होता. तो आकडा सध्या 10 कोटीपर्यंत पोहचला आहे.   

PMKSY योजनेत मोठा बदल, पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनेत (Pm Kisan Samman Nidhi Scheme) मोठा बदल केला आहे. या बदलाचा परिणाम देशातील 12 कोटी लाभार्थ्यांवर होणार आहे. सरकारने 13 व्या हफ्त्याआधी हा बदल केला आहे. या बदलामुळे लाभार्थ्यांवर नक्की काय बदल होणार हे आपण जाणून घेणार आहोत. (central government big changes in pmksy pm kisan samman nidhi scheme know details)

आता लाभार्थ्यांना किसान पोर्टलवर जाऊन आधार कार्डच्या मदतीने स्टेटस पाहता येणार नाही. त्यामुळे आता स्टेटस पाहण्यासाठी लाभार्थ्यांना नोंदणीकृत मोबाईल नंबर एंटर करावा लागणार आहे. 

याआधी लाभार्थी आधार किंवा मोबाईल नंबरद्वारे स्टेटस पाहता यायचं. मात्र यानंतर मोबाईल नंबरऐवजी आधार कार्डद्वारे स्टेटस पाहता यायचं. मात्र आता नव्या नियमांनुसार आधार क्रमांकाने नाही, तर मोबाईल नंबरद्वारेच स्टेटस पाहता येणार आहे. 

योजनेबाबत थोडक्यात 

केंद्र सरकारकडून या योजनेद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपयांचे 3 हफ्ते पाठवले जातात. सरकारकडून ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. सरकारने आतापर्यंत 12 हफ्ते पाठवण्यात आला आहेत. या योजनेच्या सुरुवातीला लाभार्थ्यांचा आकडा हा 3 कोटी 16 लाख होता. तो आकडा सध्या 10 कोटीपर्यंत पोहचला आहे. 

Read More