Marathi News> भारत
Advertisement

सलग सातव्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

अद्याप या गोळीबारात कुणीही जखमी झाल्याची माहिती नाही

सलग सातव्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

नवी दिल्ली : पाकिस्तान नियंत्रण रेषेवर (एलओसी) सलग शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे. बुधवारी आणि गुरुवारी रात्री पाकिस्तानी सेनेकडून जम्मू-काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. रात्रभर या ठिकाणी गोळीबार सुरू होता. भारतीय लष्करानंही सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केलीय. शहरी भागाला पाकिस्तानकडून लक्ष्य केलं जातंय. प्रचंड गोळीबार सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे.

अद्याप या गोळीबारात कुणीही जखमी झाल्याची माहिती नाही. गुरुवारी सकाळी जवळपास ७ वाजता हा गोळीबार बंद झाल्याचं समजतंय. 

उल्लेखनीय म्हणजे, गेले सात दिवस पाकिस्तानकडून सलग शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे. जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील सुरक्षा दलाच्या चौक्यांवरही पाकिस्तान्यांकडून गोळीबार करण्यात आला. भारतीय सेनेनंही याचा सडेतोड प्रत्यूत्तर दिलं. 

यापूर्वी भारतीय सेनेनं मंगळवारी रात्रीही सीमेपलिकडून होणाऱ्या गोळीबाराला प्रत्यूत्तर देताना पाकिस्तानच्या पाच चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या या गोळीबारात पाच जवान जखमी झाले होते. 

बुधवारी पाकिस्तान सैनिकांनी पुंछ जिल्ह्यात सायंकाळी सात वाजल्याच्या सुमारास मेंढर, बालाकोट आणि कृष्णा खोऱ्यातील सेक्टरमध्ये पुढच्या चौक्यांवर आणि रहिवाशांच्या घरांवर गोळीबार केला होता. भारतीय जवानांनी इथेही हा हल्ला परतवून लावला होता. 

मंगळवारीही जम्मू, राजौरी आणि पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला होता. 

 

Read More