Marathi News> भारत
Advertisement

CBSEचा निकाल आजही जाहीर नाही; सुधारीत तारीख जाणून घेण्यासाठी वाचा

CBSE Class 10, 12 Board Exam Term 1 Results: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा टर्म 1 चे निकाल आज जाहीर करण्याची शक्यता होती. परंतू आज निकाल जाहीर झालेले नाही.

CBSEचा निकाल आजही जाहीर नाही; सुधारीत तारीख जाणून घेण्यासाठी वाचा

मुंबई :CBSE Class 10, 12 Board Exam Term 1 Results: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा टर्म 1 चे निकाल आज जाहीर करण्याची शक्यता होती. परंतू बोर्डाने आज संकेतस्थळावर निकाल जारी केलेले नाहीत.

संपूर्ण भारतातील लाखो विद्यार्थी त्यांच्या इयत्ता 10 आणि 12 टर्म 1 परीक्षेच्या 2022 च्या निकालाची वाट पाहत आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सोमवारी (24 जानेवारी) CBSE इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा टर्म 1 निकाल जाहीर करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, मंडळाकडून अद्याप अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आजही निकाल जारी होणार नाही. हे स्पष्ट झाले आहे.

CBSE इयत्ता 10, 12 बोर्ड परीक्षा टर्म 1 चा निकाल आणि पुढील अपडेट कसे तपासायचे?

  • विद्यार्थ्यांना CBSE च्या अधिकृत वेबसाइटला cbse.nic.in भेट द्या.
  • होम पेजवर, 'रिझल्ट' लिंकवर क्लिक करा.
  • एक नवीन पेज ओपन होईल केले.
  • तेथे रोल नंबर प्रविष्ट करा आणि 'सबमिट' पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर CBSE इयत्ता 10 किंवा 12 बोर्ड परीक्षेचा टर्म 1 निकाल 2022 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

 

Read More