Marathi News> भारत
Advertisement

10 th- 12 th Exams : दहावी- बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

10th Exam dates : वर्षभर केलेल्या अभ्यासानंतर आता परीक्षेचा क्षण जवळ आला असून, इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.   

10 th- 12 th Exams : दहावी- बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

CBSE 10th and 12th Date Sheet:  (CBSE ) सीबीएससीनं दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार या दोन्ही परीक्षा 15 फेब्रुवारीला सुरु होणार आहेत. ज्यामध्ये इयत्ता दहावीची परीक्षा 13 मार्च रोजी संपणार असून, इयत्ता बारावीची परीक्षा 2 एप्रिल पर्यंत सुरु राहणार आहे. दोन वेळांमध्ये ही परीक्षा होणार असल्याची माहिती सीबीएसईच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या डेटशीटमध्ये देण्यात आली आहे. 

दहावी आणि बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षांच्या तारखांसोबतच बोर्डानं प्रात्यक्षिक अर्थात Practicals च्या तारखाही जाहीर केल्या आहेत. ज्यांची सुरुवात 1 जानेवारीला होणार असून, 15 फेब्रुवारीला त्या पूर्ण होणार आहेत. बोर्डाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार दोन वेळांमध्ये होणाऱ्या या परीक्षेचा पहिला टप्पा सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत पार पडणार आहे. विद्यार्थी परीक्षांच्या या डेटशीट cbse.gov.in आणि cbse.nic.in या संकेतस्थळांवरही पाहू शकतात. 

 

संकेतस्थळावर कशी पाहाल परीक्षेचं वेळापत्रक आणि इतर तपशील? 

  • डेटशीट जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी cbse.gov.in या संकेतस्थळावर ही शीट पाहावी. 
  • होम पेजवर 'Lastest News' सेक्शनमध्ये 'CBSE Class 10 board exam 2024 datesheet' किंवा 'CBSE Class 12 board exam 2024 datesheet' लिंक अॅक्टीव्ह होईल, ज्यानंतर या लिंकवर क्लिक करा. 
  • तुमच्या समोरील स्क्रीनवर डेटशीची पीडीएफ Open होईल. जिथं तुम्ही विषयानुसार वेळापत्रक पाहू शकणार आहात. 
  • यापुढं तुम्ही डेटशीट डाऊनलोड करून तिची प्रिंट काढून त्यानुसार अभ्यासाला सुरुवात करु शकता. 

हेसुद्धा वाचा : आश्रम शाळेत बाथरुमच नाही; कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना नदीवर करावी लागतेय अंघोळ

 


साधारण 55 दिवसांसाठी चालणाऱ्या या परीक्षेच्या दृष्टीनं सीबीएसईनं काही सूचनाही देण्यात आल्या आहेत. काय आहेत त्या सूचना? पाहा... 

- दोन विषयांच्या परीक्षेमध्ये पुरेसा वेळ असावा
- इयत्ता बारावीची डेटशीट जाहीर करताना JEE Main परीक्षेच्या तारखांची काळजी घेण्यात आली आहे. 
- दोन्ही विषयांच्या परीक्षा एकाच तारखेला नसाव्यात याची काळजी बोर्डानं घेतली आहे. 
- सकाळी 10.30 वाजल्यापासून या परीक्षा सुरु होतील. 
- विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीची तयारी अपेक्षित वेळात करता यावी यासाठी डेटशीत परीक्षेच्या मूळ तारखांच्या बरीच आधी जाहीर करण्यात आली आहे. 

Read More