Marathi News> भारत
Advertisement

दगड आणि सुकलेल्या झाडात लपलीय रानमांजर... पाहा तुमच्या नजरेला ती दिसतेय का?

हा फोटो जंगलातील खडकांचा फोटो आहे. ज्यामध्ये दगडं, सुकलेली झाडं आहेत. परंतु या फोटोत एक मांजर देखील लपली आहे.

दगड आणि सुकलेल्या झाडात लपलीय रानमांजर... पाहा तुमच्या नजरेला ती दिसतेय का?

मुंबई : सोशल मीडियावर दररोज लाखो पोस्ट व्हायरल होत असतात, यात काही फोटो, व्हिडीओ किंवा टेक्ट फॉरमॅटमध्ये माहिती दिलेली असते. जी लोकांना फार आवडते आणि लोक त्यांना आपल्या अकाउंटवरुन देखील शेअर करायला सुरूवात करतात. ज्यामुळे काही वेळातच अशी पोस्ट ट्रेंडिंग होते. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर ट्रेंडिंग होत आहे. ज्यामुळे तुमचे मनोरंजनच होत नाही, तर तुमची आयक्यू टेस्ट देखील होते.

हा फोटो जंगलातील खडकांचा फोटो आहे. ज्यामध्ये दगडं, सुकलेली झाडं आहेत. परंतु या फोटोत एक मांजर देखील लपली आहे. ही एक रानमांजर आहे, जी तुम्हाला सहजासहजी दिसणार नाही आणि हेच तुमचं चॅलेंज आहे.

तुम्हाला या फोटोमध्ये रानमांजर शोधून दाखवायची आहे. भलाभल्यांना या फोटोमध्ये मांजर शोधता आलेली नाही. पाहा तुम्हाला तरी ती शोधता येतेय का? 

अनेकांना या फोटमध्ये दोन मांजर दिसल्या आहेत. तर अनेकांना एक मांजर शोधताना देखील घाम फुटला आहे. तर काही युजर्सनी फोटोला झुम करुन मांजर स्पॉट केली आहे.

fallbacks

माहितीनुसार या फोटोमध्ये एकच मांजर आहे. जी मोठ्या दगडाच्या डाव्याबाजूला बसली आहे. या फोटोमध्ये मांजर शोधणं फारच मनोरंजक आहे. तुम्हाला देखील या फोटोत मांजर दिसली असेल, तर तुमच्या मित्रांना हे चॅलेंज पाठवा. पाहा त्यांना यामध्ये मांजर शोधता येतेय का.

Read More