Marathi News> भारत
Advertisement

माणुसकीची किंमत...! दोन मिनिटे बस थांबवल्याने नोकरी गेली, कंडक्टरने घेतला टोकाचा निर्णय

Uttar Pradesh Bus Conductor Death: उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बस वाहकाला नोकरीवरुन निलंबीत केल्यानंतर त्याने जीवन संपवले आहे. 

 माणुसकीची किंमत...! दोन मिनिटे बस थांबवल्याने नोकरी गेली, कंडक्टरने घेतला टोकाचा निर्णय

Uttar Pradesh Bus Conductor Death: उत्तर प्रदेश राज्य परिवहनाने नोकरीवरुन कमी केल्यानंतर कंडक्टरने ट्रेनसमोर उडी मारून आपलं आयुष्य संपवले आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मोहित यादव असं या वाहकाचे नाव असून तो रविवारी रात्रीपासून बेपत्ता होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह रेल्वे रूळांवर सापडला होता. माणूसकीच्या नात्याने केलेली मदतच मोहितच्या जीवावर उठल्याने परिसरातून एकच हळहळ व्यक्त होत आहे. 

मोहित हा उत्तर प्रदेश परिवहन मंडळात वाहक होता. 3 जून रोजी दिल्लीला जाणाऱ्या बसमध्ये तो कार्यरत होता. त्याचवेळी दोन प्रवाशांना नमाज अदा करण्यासाठी त्याने बरेली -दिल्ली महामार्गावर बस दोन मिनिटांसाठी थांबवली होती.  त्याच्या या चुकीसाठी मोहित आणि बस चालकाविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली. गेल्या आठ वर्षांपासून तो राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये कंत्राटी कर्मचारी होता. एका छोट्याश्या चुकीसाठी त्याच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळं ते नैराश्यात गेला होता. 

नोकरी वरुन काढून टाकल्यानंतर आता आर्थिक खर्च कसा भागवणार व कुटुंबाचा भार कसा उचलणार असा प्रश्न सतावत असल्याने त्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या कडे असलेली जमापुंजी संपल्याने त्यांने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. तर, नोकरी गेल्यानंतर पती तणावात होते, असंही मोहितच्या पत्नीने म्हटलं आहे. 

मोहितच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, आमच्याकडील बचत संपत आली होती. मोहित यांना दरमहा 17, 000 रुपये पगार मिळत होता. पण निलंबनानंतर उत्पन्नाचं काहीच साधन नव्हते. कित्येक दिवस त्यांना झोप येत नव्हते. आमचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या पगारावर अवलंबून होते. पण त्यांना त्यांच्या माणूसकीची किंमत चुकवावी लागली. 

माझ्या पतीच्या मृत्यूसाठी उत्तर प्रदेश परिवहन मंडळ व रिजनल मॅमेजर दिपक चौधरी जबाबदार आहेत. दिपक चौधरी यांनी त्यांना शिवीगाळ करत अपमानीत केले होते, असं मोहितची पत्नी रिंकीने म्हटलं आहे.  

दरम्यान मोहित यांच्या मृत्यूनंतर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात मोहित बोलताना दिसत आहे. त्यांना नमाज अदा करुन देण्यासाठी फक्त दोन मिनिटांसाठीच मी बस थांबवली. त्याचवेळी इतर लोकही खाली उतरले. त्याबद्दल कोणीही तक्रार केली नाही, असं मोहित सांगताना दिसत आहेत. 

Read More