Marathi News> भारत
Advertisement

कोण आहेत ते 1 कोटी तरुण ज्यांना मिळणार महिना 5000 रुपये, ही आहे पात्रता?

PM Internship Scheme : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी लोकसभेत वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पत नोकरी आणि कौशल्य विकासाशी संबंधीत योजनांचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी केला. 

कोण आहेत ते 1 कोटी तरुण ज्यांना मिळणार महिना 5000 रुपये,  ही आहे पात्रता?

PM Internship Scheme : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी अर्थसंकल्पात  (Budget 2024) शिक्षण आणि तरुणांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. अर्थसंकल्पात नोकरी आणि कौशल्यविकासाशी संबंधित 5 पीएम पॅकेज योजनेचा त्यांनी उल्लेख केला. यात एक योजना अशी आहे, ज्यात एक हजार औद्योगिक प्रशिक्षण संस्था अद्ययावत करण्यात येणार असून दरवर्षी 25 हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. 5 वर्षात 1 कोटी तरुणांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप (Internship) दिली जाणार आहे. इंटर्नशिपदरम्यान प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना महिना 5 हजार रुपये भत्ता मिळणार आहे.

प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये?
महिना पाच हजार रुपये मिळवण्यासाठी पात्रता काय असावी असा प्रश्न विचारला जात आहे. ही योजना पंतप्रधान पॅकेजचा भाग आहे. आमचं सरकार एक योजना सुरू करणार आहे जी 1 कोटी भारतीय तरुणांना 500 टॉपच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देईल. ही योजना 5 वर्षांसाठी असेल, असं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. 

हे तरुण 12 महिने त्या प्रशिक्षण संस्थेत शिकतील आणि स्वत:ला भविष्यासाठी तयार करतील, या दरम्यान त्यांना प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये इंटर्नशिप भत्ता दिला जाईल. याशिवाय 6 हजार रुपये एकरकमी मदत भत्ताही दिला जाणार आहे.

शिक्षणादरम्यान किंवा शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिप करून कोणत्याही क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. पण यासाठी वयाची अट ठेवण्यात आलीय. 21 ते 24 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ज्यांना अद्याप नोकरी मिळालेली नाही किंवा पूर्णवेळ शिक्षण घेता येत नाहीए अशांनाही स्टायपेंडचा लाभ मिळणार आहे. प्रशिक्षणादरम्यान होणारा खर्च कंपनी उचलणार आहे. याशिवाय इंटर्नशिप खर्चाच्या 10 टक्के रक्कम कंपनीच्या CSR फंडातून घेतली जाणार आहे. 

फर्स्ट टाईम एम्प्लॉयमेंट योजना
पीएम पॅकेजचीमधली 'फर्स्ट टाईम एम्प्लॉयमेंट' योजना आहे. या अंतर्गत ईपीएफओमध्ये पहिल्यांदा नोंदणी करणाऱ्यांचा पगार 1 लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यांना 15 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल. या योजनेचा 210 लाख तरुणांना मदत होणार आहे.

दुसरी योजना आहे- मॅन्युफॅक्चरिंगमध्ये रोजगार निर्मिती.  यात पहिल्यांदाच उत्पादन क्षेत्रात सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना EPFO ​​ठेवींच्या आधारे पहिल्या 4 वर्षांसाठी प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे. 30 लाख तरुणांना याचा फायदा होणार आहे.

 

Read More