Marathi News> भारत
Advertisement

अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलरपर्यंत पोहोचणार- निर्मला सितारामण

आपली अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलरपर्यंत पोहोचणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलरपर्यंत पोहोचणार- निर्मला सितारामण

नवी दिल्ली : अर्थसंकल्प २०१९ ला सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामण संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. आपली अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलरपर्यंत पोहोचणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या अर्थसंकल्पात न्यू इंडीयावर जोर आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती हा बदल जाणवू शकेल. सध्या आपली सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जी आधी अकराव्या क्रमांकावर होती.  अन्न सुरक्षेवर दुप्पट खर्च केला जाईल तसेच पंतप्रधानांच्या नेतृत्वात प्रत्येक लक्ष्य पूर्ण करु असेही यावेळी निर्मला सितारामण म्हणाल्या. 

मुद्रा लोनमुळे लोकांच्या आयुष्यात बदल झाला आहे. सरकारी प्रक्रीया आणखी सोप्पी बनवली जाईल. देशाला प्रदूषणमुक्त बनविण्याचे लक्ष्य असल्याचेही त्या म्हणाल्या.

भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

नवीन औद्योगिक कॉरिडोर बनवण्याचे लक्ष्य
प्रत्येक घरात वीज, शौचालय देण्याचे लक्ष्य

कॉरिडोर हायवेला जोडण्याचे काम वेगात

१२ वर्षात रेल्वे साठी ५० लाख कोटी रुपये पाहीजे आहेत.रेल्वेत पीपीपी मॉडेलने पैसे येतील.

वन नेशन वन ग्रीड योजना वीजेसाठी..सर्व राज्यांना ग्रीडने वीज

सागरमाला योजनांमुळे छोट्या बेटांचा विकास होईल

३०० किमी नवीन मेट्रो लाईन ला मंजूरी दिली. इलेक्ट्रीक वाहनांना सूट दिली

सुक्ष्म आणि लघु उद्योगातून रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न.उद्योगांचा नफा वाढवावा लागेल. मेक इन इंडियावर भर द्यावा लागेल

Read More