Marathi News> भारत
Advertisement

Bomb Attack । केरळमध्ये RSS च्या ऑफिसवर बॉम्बहल्ला

 Bomb attack on RSS office in Kerala : केरळमध्ये आरएसएसच्या ऑफिसवर (RSS office) बॉम्बहल्ला ( Bomb attack) करण्यात आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

 Bomb Attack । केरळमध्ये RSS च्या ऑफिसवर बॉम्बहल्ला

पयन्नूर : Bomb attack on RSS office in Kerala : केरळमध्ये आरएसएसच्या ऑफिसवर (RSS office) बॉम्बहल्ला ( Bomb attack) करण्यात आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. केरळमधील कन्नूरच्या पयन्नूरमधील ही घटना आहे. हल्ल्यात इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याची माहिती आहे. हा हल्ला आज पहाटे घडवून आणण्यात आला.

केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील पयन्नूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या  कार्यालयावर मंगळवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. स्थानिक पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असतानाही हा हल्ला झाला. बॉम्ब हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

 कन्नूरसारख्या संवेदनशील जिल्ह्यात कार्यालयांना विशेष संरक्षण द्यायचे आहे. ते केले जात नाही. हा केवळ निष्काळजीपणा आहे. हे सांगताना मला खेद वाटतो. आणि राज्यातील कोणत्याही राजकीय कार्यालयाचे नुकसान झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा भाजपचे टॉम वडाक्कन यांनी दिला आहे.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे. सामाजिक संघटनांवर बॉम्ब फेकण्याइतकी खालावली आहे हे धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. याआधीही संघाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत. सामाजिक कार्यात आणि अशा प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था त्वरीत हाताळली पाहिजे. याला पोलीस आणि राज्य प्रशासन जबाबदार आहे. केरळची जनता हे कधीही सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपकडून आली आहे.

Read More