Marathi News> भारत
Advertisement

गावागावात वेळेत पोहोचणार वॅक्सिन, केंद्राने राज्यांना पाठवला प्लान

 केंद्र सरकार प्रत्येक राज्यात ब्लॉक स्तरावर ब्लॉक टास्क फोर्स (Block Task Force) तयार करेल. 

गावागावात वेळेत पोहोचणार वॅक्सिन, केंद्राने राज्यांना पाठवला प्लान

नवी दिल्ली : कोरोना वॅक्सिन (Corona Vaccine) वेळेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार रणनीती बनवण्याच्या तयारीत आहेत. बुधवारी यासंदर्भात सरकारने महत्वाचा निर्णय घेतला. ज्यानुसार सरकार प्रत्येक राज्यात ब्लॉक स्तरावर ब्लॉक टास्क फोर्स (Block Task Force) तयार करेल. यामुळे वॅक्सिन गावागावात पोहोचणार आहे. 

ही योजना ग्राऊंड लेव्हलपर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्र लिहून लवकरात लवकर ब्लॉक टास्क फोर्स बनवण्यास सांगितलंय. देशातील प्रत्येक शेवटच्या भागात या टास्क फोर्सच्या मदतीने कोरोना वॅक्सिनचे वाटप होईल. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच स्थानिकांची कामगिरी देखील महत्वपूर्ण असणार आहे. 

प्रत्येक टास्कफोर्स एसडीएम किंवा तहसीलदारकडून लीड केला जाणार आहे. या फोर्समध्ये एसडीएम, तहसीलदार यांच्याव्यतिरिक्त स्थानिक विना सरकारी संघटना म्हणजेच एनजीओ, विभागातील प्रभावी व्यक्ती आणि धार्मिक नेत्यांना सहभागी करुन घेतलं जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत यासंदर्भात माहिती दिली होती. 

वॅक्सिनेशन प्रक्रियेचे डिसेंट्रलायझेशन करा असे आवाहन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना केले. केंद्र सरकारतर्फे आरोग्य विभागाने अधिकृतरित्या राज्यांना कोरोना वॅक्सीन येण्याआधी पूर्णपणे सज्ज राहण्याचे आवाहन केलंय. 

Read More