Marathi News> भारत
Advertisement

भाजपा खासदाराला मोबाईलऐवजी पाठवले दगड

ई- कॉमर्स साईटने लावला चुना 

भाजपा खासदाराला मोबाईलऐवजी पाठवले दगड

मुंबई : ऑनलाईन खरेदी करण्याच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांपासून लक्षणीय वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे ही वाढ फक्त खरेदीमध्येच नव्हे, तर ऑनलाईन खरेदीरम्यान होणाऱ्या फसवणुकीमध्येही होत आहे. अनेकदा सर्वसामान्यांना ऑनलाईन खरेदीच्या वेळी वाईट अनुभव आल्याची उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. त्यातच आता भर पडली आहे ती अशाच आणखी एका घटनेची. मुख्य म्हणजे ऑनलाईन खरेदीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ऍमेझॉन या साईटवरुन एका भाजपा खासदारालाच चुना लावला आहे. 

Khagen Murmu असं नाव असणाऱ्या या मालदा उत्तर येथील खासदारांना सोमवारी एक धक्का बसला. जवळपास तीन वेळा आमदार असणारे आणि सध्याच्या घडीला खासदारकीचं पद भूषवणाऱ्या Khagen Murmu यांनी दिवाळीच्या सवलींचा लाभ घेत ११ हजार ९९९ रुपयांचा मोबाईल फोन ऑर्डर केला होता. एका नातेवाईकाला भेट देण्यासाठी म्हणून त्यांनी हा फोन ऑर्डर केला होता. ही खरेदी करतेवेळी त्यांनी पैसे देण्यासाठी 'कॅश ऑन डिलीव्हरी' हा पर्याय निवडला होता. 

रविवारी सायंकाळी ही ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोहोचली. ज्यानंतर त्यांनी बॉक्स न खोलताच डिलीव्हरी बॉयच्या हाती पैसे दिले. सोमवारी सकाळी तो बॉक्स खोलताच कोणा एका वेगळ्याच कंपनीचा बॉक्स असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. बरं हा प्रकार इथवर थांबला नाही. बॉक्स खोलताच त्यांना यात मोबाईलऐवजी दगड असल्याचं लक्षात आलं. तेव्हा मात्र त्यांना धक्काच बसला. 

याचविषयी सांगताना Khagen Murmu यांनी हा सर्व प्रकार अतिशय धक्कादायक असल्याचं म्हणत तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. यापूर्वी आपण कधीही काहीच ऑनलाईन न मागवल्याचं सांगत झाल्या प्रकाराची माहिती आपण ग्राहक तक्रार निवारण आणि याच्याशी संबंधित खातं हाताळणाऱ्या केंद्रीय मंत्रीमहोदयांकडे करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

Read More