Marathi News> भारत
Advertisement

शेतात ट्रॅक्टर चालवताना 'ड्रीम गर्ल'ला पाहिलंत का?

हेमा मालिनी यांनाना भाजपाकडून दुसऱ्यांदा खासदार बनण्याची संधी मिळालीय

शेतात ट्रॅक्टर चालवताना 'ड्रीम गर्ल'ला पाहिलंत का?

मथुरा : मथुरा मतदारसंघातील खासदार आणि भाजपा उमेद्वार हेमा मालिनी शेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हरएक प्रयत्न करून पाहत आहेत. ३१ मार्च रोजी गोवर्धन क्षेत्रात गव्हाचं पीक कापताना त्या दिसल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी त्या एका बटाट्याच्या शेतात दाखल झाल्या आणि त्यांनी केवळ बटाटे काढले नाहीत तर त्या ट्रॅक्टरवरही स्वार झालेल्या दिसल्या. 

ज्येष्ठी अभिनेत्री हेमा मालिनी यांना आपल्या प्रचारात कोणतीही कसर बाकी ठेवायची नाही. त्यांना भाजपाकडून दुसऱ्यांदा खासदार बनण्याची संधी मिळालीय. याच प्रयत्नात आज त्या आपल्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची टीम घेऊन मांट क्षेत्रातील बाटाट्याच्या शेतात दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टरवर स्वार होऊन तो चालवण्याचाही प्रयत्न केला. हेमा मालिनी यांचं हे रूप पाहून प्रत्यक्षदर्शींनीही आश्चर्य व्यक्त केलं. 

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधला. शेतकऱ्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी मोदी सरकार कशा पद्धतीनं काम करत आहे, हेदेखील पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 

Read More