Marathi News> भारत
Advertisement

कर्नाटक: 'कॉंग्रेसचे मंत्री म्हणतात भाजपला इंग्रजी येत नाही!'

 कर्नाटकात 'निर्दोष अल्पसंख्यांकां'विरूद्ध दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्यासंबंधीच्या सर्क्युलरवरून भाजपने सत्ताधारी काँग्रेसविरूद्ध हल्लाबोल सुरू केला आहे

कर्नाटक: 'कॉंग्रेसचे मंत्री म्हणतात भाजपला इंग्रजी येत नाही!'

बंगळुरू: कर्नाटक सरकारमधील काँग्रेसचे मंत्री रामालिंगा रेड्डी यांनी भाजपला इंग्रजी येत नसून ती फारच कच्ची असल्याचे म्हटले आहे. कर्नाटकात 'निर्दोष अल्पसंख्यांकां'विरूद्ध दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्यासंबंधीच्या सर्क्युलरवरून भाजपने सत्ताधारी काँग्रेसविरूद्ध हल्लाबोल सुरू केला आहे. मात्र, याच हल्लाबोलवरून रेड्डी यांनी भाजपला टोला लगावला आहे.

रेड्डी यांनी म्हटले आह की, भाजपला इंग्रजी येत नाही. सरकारला मिळालेले पत्र हे केवळ पोलिसांनी दिलेले एक स्मरणपत्र आहे. ते कोणत्याही प्रकारचे सर्क्युलर नाही. पण, भाजपाल उत्तम प्रकारे इंग्रजी येत नाही. त्यामुळे ते टीका करत आहेत. अल्पसंख्याक नेत्यांनी म्हटले होते की, अल्पसंख्याकाविरूद्ध काही खोटे खटले दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणावरूनच आयजीने सर्व पोलीस अधिकाऱ्यांना एक स्मरणपत्र पाठवले असल्याचे रामालिंगा रेंड्डी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सध्या कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात पोलिसांचे हे पत्रक एक चर्चेचा मुद्दा बनला आहे. राज्याच्या सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे. यात पोलीस अधिकारी आणि प्रत्येक जिल्ह्यातील एसपीसोबत अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांविरूद्ध सुरू असलेल्या जातियवादी हिंसेची प्रकरणे रोखण्याबाबत त्यांचे मत मागविण्यात आले आहे. महत्त्वाचे असे की, हे सर्क्युलर विधानसभा निवडणूक २०१८च्या काही महिने आगोदर पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी म्हटले आहे की, आम्ही निर्दोष लोकांवरील खटले मागे घेऊ इच्छितो. केवळ मुसलमानच नव्हे तर, सर्वच जाती, धर्मातील निर्दोष व्यक्तिंवरील खटले आम्ही मागे घेऊ इच्छितो. आम्ही शेतकरी आणि कन्नड आंदोलनकांवरीलही खटले मागे घेऊ इच्छितो. मात्र, भाजपला राज्यात दुसऱ्यांदा पराभव स्विकारावा लागणार असल्याने खोट्या अपवा पसरवल्या जात असल्याचा आरोपही मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी केला आहे.

Read More