Marathi News> भारत
Advertisement

भाजपची आणखी एक यादी जाहीर, मनेका गांधी, वरुण गांधी यांना उमेदवारी

भाजपने आणखी एक उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मनेका गांधी, वरुण गांधी, रिटा बहुगुणा आणि जयाप्रदा यांना उमेदवारी दिली आहे.  

भाजपची आणखी एक यादी जाहीर, मनेका गांधी, वरुण गांधी यांना उमेदवारी

नवी दिल्ली : भाजपने आणखी एक उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मनेका गांधी, वरुण गांधी, रिटा बहुगुणा आणि जयाप्रदा यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, जयाप्रदा यांनी समाजवादी पक्षातून थेट भाजपमध्ये प्रवेश करत आपली उमेवारी पक्की केली आहे. त्याविद्यमान खासदार आहेत. मनेका गांधी या सुल्तानपूर आणि वरूण गांधी पीलीभीतमधून निवडणूक लढवणार आहेत. कानपूरमधून ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांचे तिकीट भाजपने कापले. त्यांच्याऐवजी सत्यदेव पचौरी उमेदवार असणार आहेत. तर अलाहाबादमधून रिटा बहुगुणा जोशी उमेदवार असतील. तर जयाप्रदा या रामपूर मतदार संघातून पुन्हा नशिब अजमावत आहेत. यावेळी त्या भाजपकडून रिंगणात उतरल्या आहेत.

समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी आज मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जयाप्रदा समाजवादी पक्षाकडून रामपूर मतदार संघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. जयाप्रदा यावेळी भाजपकडून आपले नशीब अजमावणार आहे. भाजपचे दिग्गज नेता नेपाल सिंह यांचे वाढते वय आणि आजारपणामुळे त्यांच्या जागी भाजपाला ठोस उमेदवार हवा होता. आता जयाप्रदा यांच्या आगमानामुळे भाजपची चिंता मिटल्याची चिन्हे आहेत. समाजवादी पक्षाचे आजम खान यांच्याविरोधात जयाप्रदा लढणार आहेत. जयाप्रदा २००४ आणि २००९ मध्ये रामपूरमधून खासदार म्हणून संसदेत गेल्या आहेत. दोन्ही वेळेस जयाप्रदा यांनी काँग्रेसच्या बेगम नूर बानो यांचा पराभव केला आहे.

Read More