Marathi News> भारत
Advertisement

भाजपच्या 'या' नेत्याने पुशअप मारण्याच्या स्पर्धेत न्यूज अँकरला हरवले

त्यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भाजपच्या 'या' नेत्याने पुशअप मारण्याच्या स्पर्धेत न्यूज अँकरला हरवले

आगरतळा: त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांचे नाव वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. मात्र, यावेळी ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. 'इंडिया टुडे' या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी पुशअप मारण्याच्या स्पर्धेत वृत्तनिवेदक राहुल कनवाल यांना हरवले. यावेळी प्रेक्षकांनी बिप्लब देव यांना चांगलाच पाठिंबा दिला. बिप्लब देव यांनी एका दमात ३५ पुशअप्स मारले. त्यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

काही दिवसांपूर्वी केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही बिप्लब देव यांना फिटनेस चँलेज दिले होते. हे चँलेज पूर्ण केल्यानंतर बिप्लब देव यांनी तरुणांना दररोज व्यायाम करण्याचे आवाहन केले होते. 

Read More