Marathi News> भारत
Advertisement

मध्य प्रदेश: २६ जानेवारीला बाईक रॅलीत फडकवला पाकिस्तानी झेंडा

प्रजासत्ताक दिनानिमित्त (२६, जानेवारी) काढलेल्या काही युवकांनी पाकिस्तानी झेंडा फडकवल्यामुळे जोरदार वाद निर्माण झाला आहे.

मध्य प्रदेश: २६ जानेवारीला बाईक रॅलीत फडकवला पाकिस्तानी झेंडा

शाजापूर : मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील शुजालपूर गावात स्वातंत्र्य दिनी (२६ जानेवारी) एक खळबळजनक घटना घडली. प्रजासत्ताक दिनानिमित्त (२६, जानेवारी) काढलेल्या काही युवकांनी पाकिस्तानी झेंडा फडकवल्यामुळे जोरदार वाद निर्माण झाला आहे.

पाकिस्तानी झेंडा फडकवल्याची माहिती मिळताच काही हिंदू संघटनांनी स्थानिक पोलीस चौकीला घेराव घालून आंदोलन केले. आंदोलकांची मागणी अशी की, हे कृत्य करणाऱ्या तरूणांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करण्यात यावी. प्राप्त माहितीनुसार अद्यापही आंदोलक मागणीवर ठाम आहेत.

म्हणून झाला वाद

प्राप्त माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनी शुजालपूर येथे शहर आणि बाजारपेठेचे ठिकाण असलेल्या काही विशेष समुहाच्या ५०हून अधीक जणांच्या समूहाने कोणतीही कायदेशीर मान्यता न घेता बाईक रॅली काढली. या रॅलीत तिरंग्यासोबत एक काळा झेंडा फडकविण्यात आला. हिंदू संघटनांनी विरोध केल्यावर पोलिसांनी या रॅलीत झेंडा पडकवणाऱ्या आणि घोषणा देणाऱ्या तिन युवकांना ताब्यात घेतले आहे.

हिंदू संघटनांचा पोलीस स्थानकाला घेराव

दरम्यान, ही घटना घडल्यावर एका तासाभरात प्रकरणाचे मोठे पडसाद उमटले. हिंदू संघटनांनी स्थानिक पोलीस स्थानकाला घेराव घातला आणि हे कृत्य करणाऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करा, अशी मागणी करत घोषणाबाजी केली.

दोषींवर कारवाई करू - पोलीस

दरम्यान, २६ जानेवारीनिमित्त काढलेल्या बाईक रॅलीत तिरंग्यासोबत काही वेगळ्या प्रकारचा झेंडा फडकवल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे. आम्ही योग्य पद्धतीने तपास करून दोषींवर कारवाई करू, अशी माहिती ठाण्याचे पोलीस प्रमुख दिनेश प्रजापती यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

दरम्यान, भारतीय जनता युवा मोर्चा शाजापूरचे जिल्हा अध्यक्ष सूनिल देथल यांनी झी मीडियाशी बोलताना सांगितले की, २६ जनेवारीला ३०० ते ५०० मुस्लिम युवकांनी बाईक रॅली काढली होती. यात हे युवक पाकिस्तानचा झेंडा घेऊन चालत होते. आम्ही या घटनेचा विरोध केला, असेही देथल यांनी म्हटले आहे.

Read More