Marathi News> भारत
Advertisement

हत्येच्या संशयावरून महिलेची नग्न धिंड; १५ जण तब्यात

जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांकडून हवेत गोळीबार..

हत्येच्या संशयावरून महिलेची नग्न धिंड; १५ जण तब्यात

पाटणा: बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात एका महिलेला विवस्त्र करून तिची नग्न धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. एका व्यक्तिची हत्या केल्याच्या केवळ संशयावरून जमावाने महिलेचे कपडे फाडून तिला विवस्त्र केले. त्यानंर पीडित महिलेची या समूहाने नग्न धिंड काढली. दरम्यान, महिलेला अमानुष मारहाणही करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात हालगर्जीपणाचा ठपका ठेवत पटणा विभाचे आयजी नैय्यर हसनैन खां यांनी कडक कारवाई करून एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह ८ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे. 

पोलिस अधिकारी अवकाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता असलेल्या १९ वर्षीय विमलेश शाह याचा मृतदेह सोमवारी सकाळी रेल्वे स्थानकानजीक आढळून आला. त्यानंतर चिडलेल्या जमावाने या मृत्यूला पीडितेला जबाबदार धरत तिच्यावर हल्ला केला. मृत शाहाच्या हत्येबाबत गावकऱ्यांना (दामोदरपूर)  रेल्वे स्थानकाजवळील एका महिलेवर संशय होता.

झुंडीने एकत्र आलेल्या जमावाने महिलेची धिंड काढण्याचे कृत्य केलेच. पण, त्याचबरोबर स्थानिक बाजारपेठेतील काही दुकानांनाही आगी लावल्या. तसेच, दगडफेक आणि काही नागराकांना मारहाणही केली. पोलीस अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, जमावाने मर्गावरून जाणाऱ्या काही रेल्वेवरही दगडफेक केली. या प्रकरणात पोलीसांनी आतापर्यंत १५ लोकांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सांगितले की, ते जेव्हा सोमवारी घटनास्थळावर गेले तेव्हा जमाव प्रचंड प्रक्षुब्ध झाला होता. जमावाला पांगविण्यासाठी पोलीसांना हवेत गोळीबार करावा लागला.

Read More