Marathi News> भारत
Advertisement

२०१९ मध्ये रेल्वेत होणार मोठी भरती

रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी

२०१९ मध्ये रेल्वेत होणार मोठी भरती

मुंबई : नवीन वर्षात रेल्वेत मोठी भरती निघणार आहे. जवळपास १४ हजार जागांसाठी ही भरती असणार आहे. यामध्ये  सहायक लोको पायलट, टेक्निशियन आणि गँगमॅन सारख्या पदांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक भरती ही सुरक्षेच्या क्षेत्रात असणार आहे. रेल्वे सगळ्या स्ट्रीममधील डिप्लोमा केलेल्या विद्यांर्थ्यांना नोकरीची संधी देणार आहे. लवकरच याबाबतची जाहिरात निघणार आहे. २ जानेवारी ते ३१ जानेवारी २०१९ दरम्यान अर्ज मागवले जाणार आहे. सध्या रेल्वेमध्ये 4,000 लोको पायलट, टेक्निशियन आणि 62,000 गँगमॅनची भर्ती होणार आहे. यासाठी प्रथम सत्रातील परीक्षा झाली आहे. या पदासाठी २ कोटी अर्ज आले होते.

रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, "दूसऱ्या सत्रातील परीक्षेनंतर एएलपी आणि टेक्निशियन या पदासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी लगचेच सुरुवात होणार आहे." अर्जांची तपासणी झाल्यानंतर पुढच्या वर्षी मार्चमध्ये परीक्षा होणार आहे. जेई पदासाठी शैक्षणिक पात्रता डिप्लोमा असणार आहे. पण मोठ्या प्रमाणाक बीटेक विद्यार्थी देखील अर्ज करत असल्याने त्यांना देखील संधी दिली जाणार आहे. अर्ज शुल्क ५०० रुपये असणार आहे. ज्यामध्ये परीक्षा दिल्यानंतप विद्यार्थ्याला ४०० रुपये परत दिले जाणार आहेत.

एससी/एसटी, महिला आणि दिव्यांग किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि माजी सैनिकांसाठी अर्ज फी २५० रुपये असणार आहे. परीक्षेनंतर त्यांना पूर्ण फी परत केली जाणार आहे. 

काही दिवसांपूर्वीच मागवण्यात आलेल्या सव्वा लाखांपेक्षा अधिक जागांसाठीच्या भरतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले होते. पास झालेल्या उमेदवारांची नियुक्ती सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, नॉर्थ ईस्टर्न रेल्वे आणि साउथ वेस्टर्न रेल्वेमध्ये केली जाणार आहे. संबधित जाहिरात रेल्वे डिवीजन वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Read More