Marathi News> भारत
Advertisement

वहिनीने दिली अचनाक 'बॅड न्यूज', दीराचं उत्तर ऐकताचं लगावली कानशिलात

दीराच्या  उत्तरानंतर वहिनी सापडली संकटात.... 

वहिनीने दिली अचनाक 'बॅड न्यूज', दीराचं उत्तर ऐकताचं लगावली कानशिलात

मुंबई : प्रत्येक कुटुंबात दीर आणि वहिनीच्या नात्यात एक वेगळी आणि चांगली केमिस्ट्री पाहायला मिळते. वहिनी कायम तिच्या दीराला लहान भाऊ किंवा मुलासारखी मानते. दोघांमध्ये मैत्रीचं देखील नातं असतं. एवढंच नाही तर सोशल मीडियावर वहिनी आणि दीराच्या नात्याचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. आता देखील या खास नात्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल...

व्हिडिओमध्ये वहिनी दीराला एक वाईट घटना सांगत असते. वहिनी म्हणते, 'तूला माहिती आहे राम लाल यांच्या मुलाचं निधन झालं आहे.' त्यानंतर दीर विचारतो, कसं झालं निधन? दीराच्या प्रश्नाला उत्तर देताना वहिनी म्हणते, 'त्याच्यावरून कार गेली... ' यावर उत्तर देत दीर म्हणाला, 'आपल्या वरून तर विमान गेला तरी आपल्याला काही झालं नाही...'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दीराचं उत्तर ऐकताचं वहिनीने दीरावर हात उगारला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओवर अनेकांच्या लाईक्स आणि कमेन्ट येत आहेत...

Read More