Marathi News> भारत
Advertisement

राजधानी दिल्लीतला 'बिटींग द रिट्रीट' सोहळा

 'बिटींग द रिट्रीट' सोहळा आज राजधानी नवी दिल्लीत पार पडला

राजधानी दिल्लीतला 'बिटींग द रिट्रीट' सोहळा

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता म्हणजेच 'बिटींग द रिट्रीट' सोहळा आज राजधानी नवी दिल्लीत पार पडला. तीनही सैन्यदलांच्या पथकांनी वाद्य समुहांच्या तालावर संचलन करत राष्ट्रपतींना मानवंदना दिली. 26 विविध सादरीकरणं यावेळी झाली. 

वेगवेगळ्या थिम्स वाजवल्या

18 मिलीटरी बँड पथकं, 15 पाईप आणि ड्रम बँड या संचलनात सहभागी झाले. मेजर अशोक कुमार हे या सोहळ्यासाठी विविध बँड पथकांचे प्रमुख इन्स्ट्रक्टर होते. अबाईड विथ मी ही एकमेव पाश्चात्य धून यावेळी वाजवण्यात आली. कार्यक्रमाची सांगता सारे जहा से अच्छा या लोकप्रिय गीताने झाली. 

Read More