Marathi News> भारत
Advertisement

गोव्यात ब्रिटीश पर्यटक महिलेवर बलात्कार

दक्षिण गोव्यातील काणकोण इथे वर्षीय ब्रिटीश महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. 

गोव्यात ब्रिटीश पर्यटक महिलेवर बलात्कार

पणजी : दक्षिण गोव्यातील काणकोण इथे एका बेचाळीस वर्षीय ब्रिटीश महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. काल पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या किनारपट्टी भागातील परदेशी पर्यटक महिलांवर होणारा हा दुसरा लैंगिक अत्याचाराचा प्रकार आहे.

ही घटना काणकोण रेल्वे स्थानक ते पारोळ्ळे बीच दरम्यान घडली आहे. ती रेल्वेने जाण्यासाठी स्टेशनवर गेली होती. परंतु रेल्वे उशिरा असल्यानं माघारी परतली. ती आपल्या हॉटेलकडे चालत जात होती. त्यावेळी तिला अज्ञाताने शेजारील शेतात ढकलून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला, अशी तक्रार या महिलेने पोलिसांत केलेय. पोलिसांना सीसीटीव्हीचे फुटेज मिळाले असून त्यानुसार संशयतील ताब्यात घेतले आहे. 

काणकोण ते थिवी रेल्वे स्थानकादरम्यान प्रवास करणार होती. याप्रकरणी पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. तपास कामात गुन्हे अन्वेषण विभागाची मदत घेतली असून यासाठी १२ टीम कार्यरत करण्यात आल्या आहेत. 

पारोळ्ळेपासून काणकोण रेल्वे स्टेशन दीड किलोमीटर अंतरावर आहे. याच पारोळ्ळेनजीक दीड वर्षापूर्वी एका स्वीडनच्या महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. रेल्वेला येण्यासाठी उशीर झाल्याने ती परत आपल्या हॉटेलकडे निघाली होती. ही महिला एकटीच असल्याचे लक्षात आल्याने संशयतींना तिचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तिची कागदपत्रे पैसे असलेली पर्स चोरून नेली आहेत. 

Read More