Marathi News> भारत
Advertisement

सरकारी बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप

वेतन दरवाढीच्या कारणावरून सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारलाय. 

सरकारी बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप

 नवी दिल्ली : वेतन दरवाढीच्या कारणावरून सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारलाय. देशभरातील तब्बल १० लाखांपेक्षा अधिक कर्मचारी ३० आणि  ३१ मे असे सलग दोन दिवस संपावर जात आहेत. या संपाचा फटका बँक ग्राहकांना बसणार आहे. दरम्यान, दोन दिवस बॅंक बंद राहणार असल्याने पैशाची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एटीएममधून पैसे काढून  जवळ ठेवण्यावर अनेकांचा भर दिसून येत आहे. त्यामुळे एटीएमवर काही ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे.

बँक कर्मचाऱ्यांचा वेतवाढीचा करार ३१ ऑक्टोबर २०१७ ला संपलाय. त्यामुळे १ नोव्हेंबर २०१७ पासून नवीन वेतनवाढ होणं अपेक्षित आहे. मात्र ही वेतनवाढ न झाल्याने कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. या संपाचा फटका बँक ग्राहकांना बसणार आहे. 

Read More