Marathi News> भारत
Advertisement

'या' सरकारी बँकेच्या निर्णयाने खातेधारकांना झटका, तर खासगी बँकांकडून गूड न्यूज

 मे महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) रेपो दरात (Repo Rate) अचानक वाढ करण्याची घोषणा केली होती. 

'या' सरकारी बँकेच्या निर्णयाने खातेधारकांना झटका, तर खासगी बँकांकडून गूड न्यूज

मुंबई : मे महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank Of India) रेपो दरात (Repo Rate) अचानक वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी आरबीआयने रेपो दर 4 टक्क्यांवरून 4.4 टक्के केला होता. त्यानंतर बँकांनी कर्जावरील व्याजदरात वाढ केली. याचा परिणाम ग्राहकांनी केलेल्या मुदत ठेवी (FD) आणि बचत खात्यांच्या व्याजदरावरही झाला. अनेक बँकांनी व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली होती. (bank interest rates ubi union bank of india cuts interest rate know all details)

2 कोटींपेक्षा कमीच्या एफडीत बदल

अलीकडेच आयसीआयसीआय बॅंकेंने (Icici Bank) 2 कोटींपेक्षा कमी FD चे दर बदलले आहेत. बँकेने एफडीवरील व्याज्याच्या कालावधीत  290 दिवसांवरून 10 वर्षांपर्यंत बदल केला आहे.  या निर्णायची अंमलबजावणी 16 मे 2022 पासून करण्यात आली. याशिवाय IDFC बँकेने (IDFC First Bank FD Rates) FD चे दर वाढवले ​​आहेत. 23 मे पासून लागू होणारा नवीन व्याजदर 1 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. 

अनेक खातेधारकांचं 'नुकसान'

या सर्व घडामोडी दरम्यान यूनियन बॅंक ऑफ इंडियाने (Union Bank of India) व्याजदरात घट करण्याबाबत म्हटलंय. बँकेच्या या निर्णयामुळे खातेधारकांना झटका लागला आहे.   युनियन बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. बँकेकडून 50 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरात 15 बेसिस पॉइंट्सने कपात केलीय. 

आधी 50 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर यूनियन बँकेकडून 2.90 टक्के व्याज देण्यात येत होतं. मात्र, आता व्याजदरात पॉइंट 15 ने घट केली आहे. त्यामुळे ती टक्क्याची आकडेवारी ही  2.75 टक्के इतकी झाली आहे. मात्र, बँकेने 100 ते 500 कोटींच्या ठेवींवरील व्याजदरात 20 बेसिस पॉइंटने वाढ केली आहे. यापूर्वी हा दर 2.90 टक्के होता, तो आता 3.10 टक्के करण्यात आला आहे. हे नवीन दर 1 जून 2022 पासून लागू होतील.

Read More