Marathi News> भारत
Advertisement

Bank Holidays in April 2023 : बँक कर्मचाऱ्यांची मज्जा आहे बुवा, RBI कडून सुट्ट्यांची यादी जाहीर

April 2023 Bank Holidays: बँकांची कामं ताटकळलीयेत? आज जातो, उद्या जातो असं करत एप्रिल उजाडू देऊ नका. कारण, बँकांच्या सुट्ट्यांमुळं तुमच्या डोक्याचा ताप आणखी वाढेल. पाहूनच घ्या सुट्ट्यांची यादी   

Bank Holidays in April 2023 : बँक कर्मचाऱ्यांची मज्जा आहे बुवा, RBI कडून सुट्ट्यांची यादी जाहीर

April 2023 Bank Holidays: जुन्या आर्थिक वर्षावर पूर्णविराम देत एका नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिलपासून होणार आहे. नव्या आर्थिक वर्षामध्ये अनेक गोष्टी पूर्णत्वास नेण्याचा मानस भारतीय अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अर्थात येत्या काळात RBI सुद्धा काही मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. असं असतानाच बँक कर्मचाऱ्यांना आनंद देणारी बातमी समोर आली. ही बातमी म्हणजे बँकांना असणाऱ्या सुट्ट्यांबाबतची. (Bank Holidays in April 2023 latest Marathi news )

नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे, एप्रिल महिन्यात बँका बरेच दिवस बंद असतील. त्यामुळं तुमची बँकांची कामं आताच पूर्ण करण्यासाठी घाई करा. एप्रिल महिना जरी 30 दिवसांचा असला तरीही त्यातले 15 दिवस विविध राज्यांमध्ये विविध कारणांनी बँका बंद असणार आहेत. यामध्ये आंबेडकर जयंती, (Goodfriday) गुडफ्रायडे, महावीर जयंती आणि अशा अनेक सुट्ट्या आहेत. त्यामुळं एकदा ही सुट्ट्यांची यादी पाहूनच घ्या... (Bank Holiday List in April)

एप्रिल महिन्यात कोणत्या दिवशी बँकांना सुट्ट्या? 

1 एप्रिल- बँकांचं वार्षिक क्लोजिंग. परिणामी शिलाँग, शिमला, चंदीगढ वगळता संपूर्ण देशात नागरिकांसाठी बँका बंद राहतील. 
2 एप्रिल- रविवारची आठवडी सुट्टी 
4 एप्रिल- महावीर जयंतीमुळं अहमदाबाद, आइजोल, बेलापुर, बंगळुरु, भोपाळ, चंडीगढ़, चेन्नई, जयपुर, कानपुर, कोलकाता, लखनऊ, कोलकाता, मुंबई, नागपुर, नवी दिल्ली, रांची, रायपूर येथे बँका बंद 
5 एप्रिल- बाबू जगजीवनराम जयंतीमुळं हैदराबादमध्ये बँका बंद 
7 एप्रिल- गुडफ्रायडेमुळं अगरतळा, गुवाहाटी, जयपूर, जम्मू, शिमला आणि श्रीनगर वगळता देशभरातील बँका बंद 
8 एप्रिल- महिन्यातील दुसरा शनिवार असल्यामुळं बँका बंद 
9 एप्रिल- रविवारची आठवडी सुट्टी 

हेसुद्धा वाचा : World Meteorological Day 2023 : चक्रीवादळांची नावं कोण ठरवतं? पाहा कुणीही न सांगितलेली माहिती 

14 एप्रिल- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर जयंतीनिमित्त भोपाश, नवी दिल्ली, रायपुर, शिलाँग आणि शिमला वगळता देशभरातील बँकांना सुट्टी 
15 एप्रिल- विशु, बोहाग बिहू, हिमाचल दिवस, बंगाली नववर्ष यामुळं अगरतळा, गुवाहाटी, कोच्ची, कोलकाता, शिमला आणि तिरुवअनंतपूरम येथे बँका बंद 
16 एप्रिल- रविवारची आठवडी सुट्टी 
18 एप्रिल- शब-ए-कद्रमुळं जम्मू आणि श्रीनगरमधील बँकांना सुट्टी 
21 एप्रिल- ईद-उल-फितरच्या निमित्तानं अगरतळा, जम्मू, कोच्ची, श्रीनगर, तिरुवअनंतपूरम येथे बँका बंद 
22 एप्रिल- ईद आणि महिन्यातील चौथा शनिवार असल्यामुळं अनेक बँका बंद 
23 एप्रिल - रविवार असल्यामुळं आठवडी सुट्टी 
30 एप्रिल- महिनाअखेर, रविवार असल्यानं इथंही आठवडी सुट्टी 

Read More