Marathi News> भारत
Advertisement

22 जानेवारीलाच प्रसूती करा! गर्भवती महिलांचा डॉक्टरांकडे हट्ट; कारण फारच रंजक...

Ram Mandir in Ayodhya : येत्या 22 जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. अशातच उत्तर प्रदेशातील गर्भवती महिलांनी डॉक्टरांकडे 22 जानेवारीलाच प्रसुती करण्याचा हट्ट धरला आहे. नेमकं यामागे कोणते कारण आहे ते जाणून घेऊया...

22 जानेवारीलाच प्रसूती करा! गर्भवती महिलांचा डॉक्टरांकडे हट्ट; कारण फारच रंजक...

Ayodhya Ram Mandir Inauguration News In Marathi : उत्तर प्रदेशातील अयोध्येत 22 जानेवारी भव्य मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. याच दिवशी प्रभू श्री राम यांच्या भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहात वातावरण पाहायला मिळत आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींना या  ऐतिहासिक कार्यक्रमासाठी राम मंदिर ट्रस्टकडून आमंत्रण देण्यात आले आहे. हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करण्याची तयारी सुरु आहे. 

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना आवाहन केले की, 22 जानेवारीला अयोध्येत न येता हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करा. यातच उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक अनोखी बातमी समोर येतेय, ती म्हणजे कानपूरमधील गर्भवती महिलांनी डॉक्टरांकडे एक वेगळीच मागणी केली आहे. 22 जानेवारीला बाळाचा जन्म व्हायला हवा अशी इच्छा व्यक्त  केली आहे.  22 जानेवारी हा शुभ दिवस असून या दिवशी बाळाचा जन्म व्हावा, अशी इच्छा गर्भवती महिलांची आहे.

ज्या दिवशी रामलला अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान होणार त्याच दिवशी नवीन पाहुण्याचं आगमन झालं तर तो शुभ योग असेल, असे कुटुंबीयांनी सांगितले. डॉक्टरांनी देखील या वृत्ताला दुजारा दिला असून शक्य तितका प्रयत्न केला जाईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

GSVM वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाचे अध्यक्ष डॉ. सीमा द्विवेद यांनी सांगितले की, प्रसूती कक्षात 14 ते 15 प्रसूती असतात. मात्र यावेळी महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मुलाचा जन्म 22 जानेवारीलाच व्हावा, अशी विनंती केली आहे. 

22 जानेवारीला 30 ऑपरेशन्स

22 जानेवारीला 30 ऑपरेशन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. साधारणपणे फक्त 14 ते 15 ऑपरेशन्स होत असतात.  

रामललाच्या मू्र्ती प्रतिष्ठापणेचा मुहूर्त

रामलला 22 जानेवारी 2024 रोजी भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. राम मंदिरात स्थापनेची वेळ 12.29 मिनिटे 8 ते 12.30 मिनिटे 32 सेकंद अशी असेल. प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्तचा फक्त 84 सेकंदांचा असणार आहे. 

आरोग्य यंत्रणेवर भार ?

22 जानेवारी रोजी बाळाचा जन्म झाला पाहिजे असा अट्टाहास करणाऱ्या केवळ उत्तर प्रदेशातील नाही तर हा प्रकार हळूहळू आता देशभरात वाढत चालत आहेत. इतर राज्यातील महिला आणि त्यांचे कुटुंबीय अशाप्रकारची विनंती करत आहेत. तेव्हा असे झाल्यास  22 जानेवारी रोजी आरोग्य यंत्रणेवर भार वाढण्याची शक्यता आहे. 

Read More