Marathi News> भारत
Advertisement

राम जन्मभूमी वादावर आज सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

राम जन्मभूमीच्या खटल्याला वेगळं वळण देण्याची क्षमता असणारा निर्णय

राम जन्मभूमी वादावर आज सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली : अयोध्यातेल्या राम जन्मभूमीच्या खटल्याला वेगळं वळण देण्याची क्षमता असणारा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयात येणार आहे.  मुस्लिमांना नमाज पढण्यासाठी मशीद गरजेची नसल्याचा निकाल न्यायमूर्ती इस्माईल फारूकी यांनी दिला होता. अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरुवात झाल्यावर नमाजासाठी मशिदीच्या आवश्यकतेवर १९९४ साली आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी अयोध्या रामजन्मभूमी खटल्यातील मुस्लिम याचिकाकर्त्यांची मागणी होती. 

२० ऑगस्टला या संदर्भात सरन्यायाधीशांच्या खंडपिठानं निर्णय राखून ठेवला. याचिकाकर्त्यांनी न्यायमूर्ती इस्माईल फारुकींच्या निर्णयाचा पुनर्विचार मोठ्या खंडपीठाकडून व्हावा, अशी मागणी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर विचारार्थ होती. 

आज त्यावर सरन्यायाधीश दीपक मिश्रांसह तीन न्यायमूर्तींचं खंडपीठ निर्णय देणार आहे. आज याविषयीचा निर्णय मोठ्या खंडपीठाकडे वर्ग झाला, तर अयोध्येचा खटला आणखी लांबणार आहे. 
 

Read More