Marathi News> भारत
Advertisement

VIDEO: केदारनाथमध्ये पुन्हा एकदा लोकांनी रोखला श्वास; हिमस्खलनानंतर वेगाने बर्फ खाली आला अन्...

केदारनाथमध्ये (Kedarnath) पुन्हा एकदा हिमस्खलन झालं आहे. यामध्ये कोणतीही हानी झालेली नाही. पण ज्या वेगाने बर्फ खाली येत होता ते पाहून काही वेळासाठी लोकांनी आपला श्वास रोखून धरला होता. केदारनाथमध्ये 16 जून 2013 ला ढगफुटी झाल्याने पूर आला होता. या पुरात प्रचंड नुकसान झालं होतं.   

VIDEO: केदारनाथमध्ये पुन्हा एकदा लोकांनी रोखला श्वास; हिमस्खलनानंतर वेगाने बर्फ खाली आला अन्...
Updated: Jun 30, 2024, 06:18 PM IST

केदारनाथमध्ये (Kedarnath) पुन्हा एकदा हिमस्खलन झालं आहे. रविवारी सकाळी येथे हिमस्खलन झाल्यानंतर वेगाने बर्फ खाली घसरला. बर्फाच्या या वादळात कोणतंही नुकसान झालेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 5 वाजून 6 मिनिटांनी गांधी सरोवरच्या वरती हिमस्खलन होऊ लागलं. यामुळे लोकांमध्ये एकच धावपळ सुरु झाली होती. कारण बर्फ घसरुन फार जवळ आला होता. 

सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झालेली नाही. पण ज्या वेगाने बर्फ खाली येत होता ते पाहून काही वेळासाठी लोकांनी आपला श्वास रोखून धरला होता. केदारनाथमध्ये 16 जून 2013 ला ढगफुटी झाल्याने पूर आला होता. या पुरात प्रचंड नुकसान झालं होतं. 

केदारनाथमधील क्षेत्र अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बर्फाच्या डोंगरावर सतत हिमस्खलन होत असतं. केदारनाथ धामच्या मागे असणाऱ्या बर्फाच्या डोंगरावर रविवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हिमस्खलन झालं. बर्फ डोंगरावरुन फार खालपर्यंत आला होता. काही वेळासाठी तिथे बर्फाचं वादळ आल्यासारखी स्थितीही झाली होती. यामुळे लोक घाबरले होते. बऱ्याच वेळासाठी हे हिमस्खलन सुरु होतं. 

तसंच या डोंगरभागात हिमस्खलन होणं काही नवी गोष्ट नाही. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह रजवार यांनी कोणतंही नुकसान झालं नसल्याची माहिती दिली आहे. बर्फवृष्टी अधिक झाल्यास अशा घटना होत असतात. यामध्ये कोणतंही नुकसान होत नाही असं ते म्हणाले आहेत. 

2013 मध्ये आला होता भयानक पूर

2013 मध्ये केदारनाथला ढगफुटी झाल्याने भीषण पूर आला होता. या पुरात प्रचंड नुकसान झालं होतं. केदारनाथमधील जनजीवन सामान्य होण्यासाठी बराच काळ लागला होता. त्यामुळे रविवारी जेव्हा हिमस्खलन झालं तेव्हा काही वेळासाठी लोकांनी आपला श्वास रोखून धरला होता.