Marathi News> भारत
Advertisement

तुफान वेगाने धावणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर! तुमच्या बजेटमधील हे आहेत बेस्ट ऑप्शन

 जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचे नियोजन करीत असाल तर, मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायांचा विचार करायला हवा.

तुफान वेगाने धावणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर! तुमच्या बजेटमधील हे आहेत बेस्ट ऑप्शन

मुंबई : जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचे नियोजन करीत असाल तर, मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायांचा विचार करायला हवा. मार्केटमध्ये अनेक इलेक्ट्रिक स्कूटर्स आहेत, त्यातील प्रत्येकाच्या क्षमता वेग वेगळ्या आहेत. तसेच अनेक स्कूटर्सचा स्पीड अधिक असल्याने बाजारात त्यांना पसंती आहे. 

ओला एस 1
fallbacks

ओला इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस 1 (ola)चा टॉप स्पीड 115 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने धावू शकते. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 99,999 रुपये आहे. तुम्ही 499 रुपये देऊन बुकिंग करू शकता. ही स्कूटर 10 रंगांमध्ये उपलब्ध आहे. एका पूर्ण रिचार्जवर स्कूटर 181 किमीचा प्रवास करते. 

 

एथर 450 एक्स

fallbacks

एथर एनर्जीची इलेक्ट्रिक स्कूटर एथर 450 एक्स (ather 450x)सुद्धा स्पीडच्या बाबतीत चांगला पर्याय आहे. या स्कूटरची टॉप स्पीड 80 किलोमीटर प्रतितास इतकी आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 1 लाख 44 हजार 500 रुपये आहे. ही पूर्ण रिचार्जमध्ये 116 किलोमीटरपर्यंत  धावते.

सिम्पल वन

fallbacks
सिम्पल एनर्जी कंपनीचा मेड इन इंडिया (Made in India)स्कूटर आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 105 किलोमीटर प्रति तास इतका आहे. पूर्ण चार्ज झाल्यानंतर स्कूटर 236 किमीपर्यंत धावू शकते. 

TVS iqube

fallbacks
टीव्हीएस मोटर्सची इलेक्ट्रिक स्कूटर टीव्हीएस आयक्यूबचा टॉप स्पीड 78 किलोमीटर प्रतितास इतकी आहे. तर या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 1,00,777 इतकी आहे. ही पूर्ण रिचार्जमध्ये 75 किमीपर्यंत धावू शकते.

Read More