Marathi News> भारत
Advertisement

गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूवर हल्ला, पोलिसांनी वाचवला जीव

21 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूवर हल्ला

गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूवर हल्ला, पोलिसांनी वाचवला जीव

नवी दिल्ली : 21 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी गोल्ड मेडल जिंकणारी वेटलिफ्टर पूनम यादव हिच्यावर आणि तिच्या सहकाऱ्यांवर काही लोकांनी हल्ला केला आहे. बनारसपासून 30 किलोमीटर दूर मुंगवार गावातली ही घटना आहे. पूनम मुंगवारला तिच्या नातेवाईकाकडे गेली होती. त्यावेळी गावातल्या काही लोकांनी तिच्यावर आणि तिच्या नातेवाईकांवर हल्ला केला.

गावचा सरपंच आणि त्याच्या सहकार्याने काही वाहनांमध्ये तोडफोड देखील केली आहे. गावातील एका जमिनीवरुन हा वाद झाल्याचा बोललं जातंय. पूनमवर हल्ला झाल्यानंतर पोलीस देखील सतर्क झाल्या. शनिवारी दोन्ही बाजुच्या लोकांना बोलवण्यात आलं होतं. पूनमचे पिता आणि इतर काही नातेवाईकांसोबत पूनम देखील होती. पोलिसांनी तिला या हल्ल्यातून वाचवलं.

पूनम आणि नातेवाईकांनी तेथून पळ काढत आपला जीव वाचवला. पूनमची नातेवाईकाचा शेजाऱ्यांशी काही वाद झाला. य़ा दरम्यान पूनम तेथे पोहोचल्यानंतर वाद वाढला. पूनमच्या नातेवाईंकावर शेजाऱ्यांनी दगडफेक केली. गावातील काही लोकांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पूनम जेव्हा बचाव करण्यासाठी आली तेव्हा तिच्यावर देखील गावातील काही लोकांनी हल्ला केला. 

Read More