Marathi News> भारत
Advertisement

भाजपा-शिवसेनेच्या जागावाटप चर्चा स्थगित

भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये विधानसभा निवडणूक जागावाटपची चर्चा सध्या स्थगित 

भाजपा-शिवसेनेच्या जागावाटप चर्चा स्थगित

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वच पक्षांचे नेते जनतेशी संवाद साधण्यासाठी राज्यभर फिरत आहेत. भाजपा आणि शिवसेनेमध्ये विरोधी पक्षांतून मोठ्या प्रमाणात आयात सुरु आहे. मुख्यमंत्री कोणाचा होणार ? याबद्दलही दोन्ही पक्षांत खलबत सुरु आहेत. दरम्यान भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये विधानसभा निवडणूक जागावाटपची चर्चा सध्या स्थगित करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेनंतर म्हणजे १ सप्टेंबरनंतर जागा वाटपाची पुन्हा चर्चा सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जागावाटपाचा कोणताही एक फार्म्युला अजूनही तयार नसल्याने चर्चेत प्रगती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Read More