Marathi News> भारत
Advertisement

असं काय झालं की, मुख्यमंत्री भररस्त्यात कलेक्टरवर भडकले? व्हिडीओ पाहा

Assam Chief Minister Hemanta Biswa Sarma is angry : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा कलेक्टर नागाव यांच्यावर भररस्त्यात भडकले आणि विचारले की एवढी वाहतूक कोंडी का झाली आहे?.  लोक अडचणीत येत आहेत. 

असं काय झालं की, मुख्यमंत्री भररस्त्यात कलेक्टरवर भडकले? व्हिडीओ पाहा

मुंबई : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा डीसी नागाव यांच्यावर भररस्त्यात भडकले आणि विचारले की एवढी वाहतूक कोंडी का झाली आहे?.  लोक अडचणीत येत आहेत. राष्ट्रीय महामार्ग 37 वर गुमोठागावजवळ वाहतूक ठप्प झाल्याने मुख्यमंत्री संतापले. त्यांनी डीसीला फटकारले आणि म्हटले की कोणी राजा महाराजा येणार आहेत का?

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा गुमोठागावजवळ एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी आले होते. यादरम्यान राष्ट्रीय महामार्ग 37 वर वाहतूक कोंडी झाली होती. ट्रॅफिकमध्ये वाहने आणि रुग्णवाहिका अडकल्याचे पाहून मुख्यमंत्री सरमा यांचा पारा चढला आणि त्यांनी कलेक्टर नागाव यांना चांगलेच फैलावर घेतले. 

मुख्यमंत्र्यांनी डीसीला फटकारले आणि म्हणाले की ही वाहतूक का खोळंबली? गाड्या का थांबवल्या आहेत, कोणी राजा महाराज येणार आहेत का?

मुख्यमंत्री भडकल्याचे पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या डीसीसह अन्य अधिकाऱ्यांनी तात्काळ हा वाहतूक कोंडी दूर केली. रस्त्यात अडकलेली एक रुग्णवाहिकेलाही बाहेर काढण्यात आले.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, मी माझ्या दौऱ्यात लोकांना गैरसोय होऊ देऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले होते. असे असतानाही माझ्यासाठी वाहतूक बंद करण्यात आली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना खडसावले आहे. 

राष्ट्रीय महामार्ग 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ ठप्प होता. रुग्णवाहिकांसह इतर अनेक वाहने अडकून पडली. लोकांना त्रासाला सामोरे जावे लागले. आजच्या आसाममध्ये ही व्हीआयपी संस्कृती मान्य नसल्याचे ते म्हणाले.

Read More