Marathi News> भारत
Advertisement

उंदरांनी कुरतडल्यानं नवजात बालकाचा मृत्यू, आरोग्यमंत्री म्हणतात...

हे पाहताच त्याच्या आईनं आरडा-ओरडा केला... पण व्यर्थ...

उंदरांनी कुरतडल्यानं नवजात बालकाचा मृत्यू, आरोग्यमंत्री म्हणतात...

दरभंगा : बिहारच्या मधुबनी भागातील सरकारी रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडलीय. अवघ्या आठ दिवसांच्या एका नवजात बालकाला रुग्णालयातील आयसीयूमध्ये उंदरांनी कुरतडून ठार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. याच प्रकरणात शुक्रवारी दरभंगाला पोहचलेल्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी चौबे यांना काही प्रश्न विचारले असता त्यांनी अत्यंत घृणास्पद असं वक्तव्य केलंय.

सरकारी रुग्णालयात बालकाचा मृत्यू

मधुबनी जिल्ह्यातील नजर गावातील रहिवासी वीणा देवी यांनी एका बालकाला जन्म दिला होता. बाळाची स्थिती नाजूक असल्या कारणानं दरभंगा रुग्णालयातील शिशु विभागानं या बालकाला NICU मध्ये दाखल केलं. परंतु, सकाळी ४ - ५ वाजल्याच्या दरम्यान त्याच्या आईनं आयसीयूत प्रवेश केला तेव्हा त्यांना जे दृश्यं दिसलं ते अतिशय धक्कादायक होतं. आयसीयूमध्ये या बाळाला उंदरांनी अक्षरश: कुरतडलं होतं... हे पाहताच त्याच्या आईनं आरडा-ओरडा केला... पण व्यर्थ... उंदरांनी कुरतडलेल्या या बालकाचा मृत्यू झाला... 

रुग्णालयावर बेजबाबदारपणाचा आरोप झाला परंतु, डॉक्टरांनी मात्र हा आरोप फेटाळून लावत नवजात बालकाचा मृत्यू स्वाभाविक असल्याचं सांगितलं. 

fallbacks
अश्विनी चौबे

मंत्रीमहोद्य म्हणतात... 

त्यानंतर इथं दाखल दाखल झालेल्या अश्विनी चौबे यांनी राम मंदिराच्या मुद्यावर भाष्य केलं... राम मंदिर हा काही भाजपचा निवडणुकीचा मुद्दा नाही असं त्यांनी म्हटलं... भाजप विकासाच्या मुद्यावर पुढची निवडणूक लढणार असंही त्यांनी म्हटलं. 

यावेळी, त्यांना दरभंगाच्या रुग्णालयाच्या बेजबाबदारपणाबद्दल जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांचं म्हणणं होतं, 'अशा छोट्या मोठ्या घटना घडतंच असतात...'

दरम्यान, अश्विनी चौबे यांच्यावर या वक्तव्यावरून जोरदार टीका होतेय. 

Read More