Marathi News> भारत
Advertisement

न्यायमूर्ती शरद बोबडे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी

सर्वोच्च न्यायालयात सध्या रंजन गोगोईंनंतर बोबडे हे सगळ्यात वरिष्ठ आहेत. 

न्यायमूर्ती शरद बोबडे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी

नवी दिल्ली : न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाचा पदभार स्वीकारत आहेत. ते ४७ वे सरन्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबरला निवृत्त झाल्यानंतर आज १८ नोव्हेंबर २०१९ रोजी शरद बोबडे यांनी हा पदभार स्वीकारत आहेत.  

शरद बोबडे यांचा जन्म २४ एप्रिल १९५६ रोजी नागपूरमध्ये झाला. नागपूर विश्वविद्यालयातून बोबडेंनी एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं. १९७८ साली ते महाराष्ट्र बार काऊंन्सिलचे सदस्य बनले. १९९८ साली वरिष्ठ अधिवक्ता म्हणून त्यांची नेमणूक झाली.महाराष्ट्राचे आणि नागपूरचे सुपूत्र शरद बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाल्यामुळे नागपूर उच्च न्यायालयात सर्व न्यायाधीश आणि वकिलांनी राष्ट्रपती भवनातील शरद बोबडे यांचा शपथ ग्रहण सोहळा मोठ्या स्क्रीवर पहिला. नागपूर हाय कोर्टाच्या ऑडिटोरिममध्ये याकरता खास व्यवस्था करण्यात आली होती

शरद बोबडे हे न्यायालयीन क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांसाठी तसेच नागपूर हाय कोर्ट बार एसोसिएशन च्या सर्व वकिलांसाठी एक आदर्श आहेत.. ते आमचे प्रेरणा स्थान आणि गौरव स्थान आहेत अशी प्रतिक्रिया उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी यावेळी दिली.

२९ मार्च २००० साली बोबडेंची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश पदावर निवड करण्यात आली. १६ ऑक्टोबर २०१२ साली ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. 

सर्वोच्च न्यायालयात सध्या रंजन गोगोईंनंतर बोबडे हे सगळ्यात वरिष्ठ आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी लागोपाठ ४० दिवस अयोध्या खटल्याची सुनावणी करत निकाल दिला. 

Read More