Marathi News> भारत
Advertisement

घराचा पत्ता बदलला तर रेशनकार्ड अशा प्रकारे ट्रान्सफर करा रेशन कार्ड

घराचा पत्ता बदलला तरी टेन्शन नाही, या सोप्या टिप्स वापरून असं करा रेशन कार्ड ट्रान्सफर   

घराचा पत्ता बदलला तर रेशनकार्ड अशा प्रकारे ट्रान्सफर करा रेशन कार्ड

मुंबई : बऱ्याचदा आपण कामानिमित्त किंवा काही कारणांनी घर बदलतो. काहीवेळा शहर किंवा थेट जिल्हा बदलतो. अशावेळी आपलं रेशनकार्डवरचा पत्ता कसा बदलायचा हा प्रश्न असतो. आज आम्ही तुम्हाला त्यासाठी काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही अगदी सहजपणे रेशन कार्डवरचा पत्ता बदलू शकता. 

हे तुम्हाला माहीत आहे का?
रेशन कार्ड 3 प्रकारचे असतात. पांढरे रेशन कार्ड आहे जे त्या कुटुंबांना दिले जाते ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपर्यंत आहे. त्याच वेळी, दुसरे ऑरेंज कार्ड आहे जे ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 50 हजार ते 1 लाख दरम्यान आहे. तिसरे पिवळे कार्ड आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 15 हजारांपेक्षा कमी आहे. असे लोक दारिद्र रेषेखाली येतात.

आपलं रेशनकार्ड नेहमी अपडेट असायला हवं. जर तुम्ही तुमचा पत्ता बदलला असेल तर तुम्ही तो त्वरित अपडेट करावा. याच्या मदतीने ते तुमच्या अॅड्रेस प्रूफमध्ये योग्य माहिती देऊ शकते. 

ऑनलाइन पत्ता कसा बदलायचा पत्ता 
तुम्हाला राज्य आणि खाद्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. तिथे होमपेजवरील फॉर्म डाऊनलोड करा. या फॉर्मवर तुमची सगळी माहिती भरा आधार क्रमांक आणि कुटुंब प्रमुखाचं नाव लिहा त्यासोबत एक फोटो देखील लागणार आहे. हे सगळं तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन जमा करा. त्यानंतर तुमचं रेशकार्ड बदलेल्या पत्त्यासह येईल. 

ऑफलाइन पद्धतीनं कसा बदलायचा पत्ता 
यामध्ये तुम्हाला रेशन दुकानावर जाऊन तुमचं रेशनकार्ड जमा करावं लागणार आहे. तिथे तुम्ही काही कागदपत्र आवश्यक ती जमा करायची आहेत. त्यासोबत लागणारी माहिती आणि फोटो देणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं नवीन रेशनकार्ड मिळेल. BPL रेशनकार्डसाठी 5 तर APL साठी 10 रुपये चार्ज लावण्यात येतो. 

रेशनकार्डसाठी कोणती कागदपत्र आवश्यक
- गॅस सिलिंडरची रिसिट
- ड्रायव्हिंग लायसन्स
- वोटिंग कार्ड
- आधार कार्ड
- टॅक्स पेड रिसिप्ट
-टेलिफोन बिल

Read More