Marathi News> भारत
Advertisement

...आणि पोलिसांच्या मदतीला नागरिक आले धावून

म्हणून नागरिक हे दृश्यं पाहून संतापले.

...आणि पोलिसांच्या मदतीला नागरिक आले धावून

नागपूर : अनेकदा पाहिलं जातं की, नेहमी पोलीस नागरिकांच्या मदतीला धावून येतात. परंतु नागपूर येथे नागरिकच पोलिसांच्या मदतीला धावून आल्याचं दिसलं. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दस्ताऐवजाबाबत विचारणा करणाऱ्या शिपाई पोलिसाला वाहनधारकने मारहाण सुरु केली. जवळच्या परिसरातील नागरिकांनी ते पाहिले आणि लगेच पोलिसाच्या मदतीला धावून आले. पोलिसाला मारहाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनधारकालाच नागरिकांनी धडा शिकवल्यानंतर त्यालाच रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. ही घटना मंगळवारी घडली.

मोहम्मद मोबिन अन्सारी असं या वाहनधारकाचं नाव आहे. याच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

पोलीस शिपाई निलेश दिगंबर चौधरी असे फिर्यादीचे नाव आहे. सध्या दिगंबर हे सिताबर्डी वाहतूक झोनमध्ये कार्यरत आहेत. पोलीस शिपाई निलेश हे दुपारी संविधान चौक इथं आपली ड्युटी बजावत होते. अन्सारी हेल्मेट न घालता दुचाकी चालवत आहे, असं कर्तव्यावर असणाऱ्या निलेश यांच्या लक्षात आले. त्यांनी अन्सारी याला दुचाकी बाजुला घेवून दस्ताऐवजाबाबत विचारपूस करण्यास सुरुवात केली. 

चौकशी करताना चिडलेल्या अन्सारी याने निलेश यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ते खाली पडले आणि जखमी झाले. त्या ठिकाणी उपस्थित असलेले नागरिक हे दृश्यं पाहून संतापले आणि पोलिसांची मदत करण्यासाठी धाव घेतली. पोलिस शिपाई यांना मारहाण करणाऱ्या अन्सारीला नागरिकांनी चांगलाच धडा शिकवला. माहिती मिळताच सदर पोलिसांचे वाहन तेथे पोहोचले. पोलिसांनी नागरिकांच्या तावडीतून अन्सारी याची सुटका केली. 

Read More