Marathi News> भारत
Advertisement

अडसूळांची गटनेते पदावरून उचलबांगडी, राऊतांना लॉटरी

अविश्वास ठरावावेळी झालेला व्हीपचा घोळ अडसूळ यांना भोवला?

अडसूळांची गटनेते पदावरून उचलबांगडी, राऊतांना लॉटरी

नवी दिल्ली : शिवसेना नेते खासदार संजय राऊत संसदेत पक्षाचे दोन्ही सभागृहाचे नेते बनले आहेत. लोकसभा गटनेते पदावरून आनंदराव अडसूळ यांना हटवण्यात आलंय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतलाय. 

लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींना पत्र सादर करून या नेतेपदातील बदलाची सूचना देण्यात आली आहे. संसदेत शिवसेनेचे एकूण 21, लोकसभेत 18 आणि राज्यसभेत 3 खासदार आहेत. 

याआधी संजय राऊत राज्यसभेत पक्षाचे गटनेते होते. राऊतांच्या खासदारकीची ही तिसरी वेळ आहे. आता राज्यसभा आणि लोकसभा अशा दोन्ही जबाबदाऱ्या जबाबदाऱ्या राऊत स्वत:च सांभाळणार आहेत. 

अधिक वाचा :- अडसूळांना हटवलं नाही, संजय राऊत यांचं स्पष्टीकरण

'अविश्वास' ठरावाचा घोळ

अविश्वास ठरावावेळी झालेला व्हीपचा घोळ अडसूळ यांना भोवल्याचं म्हटलं जातंय... आणि त्यामुळेच त्यांची लोकसभा गटनेते पदावरून उचलबांगडी करण्यात आलीय. अविश्वास ठरावावेळी पक्षानं काढलेला सरकारला समर्थन करण्याचा व्हीप व्हायरल झाला होता. मात्र, प्रत्यक्षात शिवसेनेनं टाकला कामकाजावर बहिष्कार घातला होता. व्हीपच्या या घोळामुळे पक्षाची नाचक्की झाली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षात चांगल्या समन्वयासाठी उद्धव ठाकरे यांची सावध खेळी असल्याचं मानलं जातंय. 

Read More