Marathi News> भारत
Advertisement

डॉ. आंबेडकरांच्या नावाला 'राम' जोडण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न - आनंदराज

उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं सर्व सरकारी कागदपत्रांवर डॉ. भीमराव आंबेडकर यांचं नाव लिहिताना 'भीमराव रामजी आंबेडकर' असं नाव वापरण्याचे आदेश सरकारी कार्यालयांना दिलेत. उत्तर प्रदेश सरकारनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावात केलेल्या या बदलाला बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकरांनी तीव्र आक्षेप घेतलाय.

डॉ. आंबेडकरांच्या नावाला 'राम' जोडण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न - आनंदराज

लखनऊ : उत्तरप्रदेशच्या योगी सरकारनं सर्व सरकारी कागदपत्रांवर डॉ. भीमराव आंबेडकर यांचं नाव लिहिताना 'भीमराव रामजी आंबेडकर' असं नाव वापरण्याचे आदेश सरकारी कार्यालयांना दिलेत. उत्तर प्रदेश सरकारनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावात केलेल्या या बदलाला बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकरांनी तीव्र आक्षेप घेतलाय.

'आंबेडकर' या नावाला 'राम' जोडण्याचा प्रयत्न

दलितांची सहानुभूती मिळवण्यासाठी राजकीय फायद्यासाठी भाजप सरकारनं ही खेळी केल्याचा आरोप आनंदराज आंबेडकरांनी केलाय. राम मंदिराचा मु्द्दा गाजत असल्यामुळेच रामजी नाव आंबेडकरांना जो़डून राजकारण करण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. 'भीमराव आंबेडकर हे एक केवळ नाव आहे... ती 'विचारधारा' नाही... समता, न्याय, बंधुता या पायांवर त्यांनी आपली विचारधारा मांडली होती... उत्तरप्रदेशात कळीचा मुद्दा ठरलेल्या राममंदिराचा प्रश्न डोळ्यासमोर ठेऊन भाजप सरकारनं आंबेडकर या नावाला 'राम' जोडण्याचा प्रयत्न केलाय. महापुरुषांच्या नावाची गरज राजकीय पक्षांना आहे. नावाचा वापर करून मतं मिळवली जातात. तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वापरून मतं मिळवण्याचा हा एक प्रयत्न आहे... पण, नावापेक्षा कार्याची ओळख मोठी असते. आंबेडकरांचं नाव लोकांच्या हृदयापर्यंत पोहचलेलं आहे' असं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलंय. 

का केला नावात बदल?

सर्व सरकारी दस्तावेजांवर डॉ. भीमराव आंबेडकर असं नाव वापरण्याऐवजी भीमराव रामजी आंबेडकर असं पूर्ण नाव लिहिण्याचा आदेश उत्तर प्रदेश सरकारनं जारी केलाय. या निर्णयावर टीका झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर सही करताना आपलं पूर्ण नाव लिहित होते, असा युक्तीवाद भाजप सरकारकडून करण्यात आलाय.

या संदर्भात उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी बाबासाहेबांच्या नावात त्यांच्या वडिलांच्या नावाचा उल्लेख करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले होते. 

उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत सपा आणि बसपानं एकत्र येत भाजपचा पराभव केला. यात दलित मतांचा फार मोठा वाटा होता. त्यामुळे दलित मतांवर डोळा ठेवून हे पाऊल उचलल्याचं मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केलंय. 

Read More