Marathi News> भारत
Advertisement

अलिगढ विद्यापीठाचा विद्यार्थी दहशतवादी?

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा एक संशोधनाचा विद्यार्थी अतिरेकी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

अलिगढ विद्यापीठाचा विद्यार्थी दहशतवादी?

नवी दिल्ली : अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा एक संशोधनाचा विद्यार्थी अतिरेकी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

विद्यापीठातला रिसर्च स्कॉलर मन्नन बशीर वाणी याचं AK 47 रायफलसोबत छायाचित्र सोशल मीडियावर झळकल्यानंतर पोलिसांनी याची माहिती विद्यापीठाला दिली.

त्यानंतर मन्ननला विद्यापीठातून तातडीनं निलंबित करण्यात आलंय, तसंच विद्यापीठाचे अधिकारी आणि विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत त्याच्या हॉस्टेलमधल्या खोलीची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी बरंच साहित्य पोलिसांनी जप्त केलं असून त्याची छाननी केली जातेय. 

वाणी हा 2 जानेवारीनंतर विद्यापीठात आला नसल्याची माहिती आहे. तो हिजबुल मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेमध्ये सामिल झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. 

Read More